(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, 3rd Test, Day 3 Stumps Score | सिडनी कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, 197 धावांची आघाडी
IND Vs AUS Day 3 Stumps : सिडनी कसोटीवर ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाकडे आता 197 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 103 धावा झाल्या होत्या.
IND Vs AUS Day 3 Stumps : ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात दोन विकेट्सच्या मोबदल्यात 103 धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाने भारतावर 197 धावांची आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या होत्या. तर यजमानांनी भारताचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला आणि 94 धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी स्टीव्ह स्मिथ 29 आणि मार्नस लाबुशेन 47 धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर (13 धावा) आणि विल पुकोवस्की (10 धावा) यांच्या विकेट्स गमावल्या. भारतासाठी मोहम्मद सिराज और रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियासाठी तिसरा दिवस शानदार टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 2 बाद 96 धावांवरुन केली होती. पण पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत भारताने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. उपाहारापर्यंत टीम इंडियाने फक्त अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्या विकेट्स गमावल्या होत्या.
मात्र उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अवघ्या 64 धावांतच भारताच्या उर्वरित सहा खेळाडूंना माघारी पाठवलं. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 29 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स मिळवल्या. तर भारताचे तीन खेळाडू रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.
भारताकडून चेतेश्वर पुजाराने 50 धावांची खेळी रचली. तर रिषभ पंतला 36 धावा आणि रवींद्र जडेजा 28 धावांचं योगदान देण्यात यशस्वी ठरले. मात्र पंत आणि जडेजा दोघांनाही फलंदाजीदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्या या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहेत. सिडनी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आघाडी मिळवण्याची संधी आहे.