शुभमन गिलने कांगारुंना धू धू धुतले, नऊ दिवसांत ठोकले दुसरे शतक
Shubman Gill Century : इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरनंतर शुभमन गिल याच्यानंतर श्रेयस अय्यर याने दमदार शतक ठोकले.
Shubman Gill Century : इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरनंतर शुभमन गिल याच्यानंतर श्रेयस अय्यर याने दमदार शतक ठोकले. गिल याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कांगारुंच्या गोलंदाजाविरोधात गिलची बॅट तळपली. पहिल्या वनडे सामन्यात गिलने अर्धशतक ठोकले होते. आता दुसऱ्या वनडेत शतकी तडाका लावला. गिलने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. याआधी गिलने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली होती, जिथे त्याने 63 चेंडूत 74 धावा केल्या होत्या. मात्र, तेव्हा गिलचे शतक हुकले होते. पण आज त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरोधा गिलचे पहिले शतक ठोकले.
शुभमन गिलने ३५ व्या वनडे सामन्यात सहावे शतक ठोकले. त्याने ३५ डावात आतापर्यंत १९०० धावा चोपल्या आहेत. गिलने एकदिवसीय सामन्याच्या ३५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून रेकॉर्ड केला आहे. या शतकासह गिलने यावर्षी वनडेत १२०० धावांचा आकडाही गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिलचे हे पहिले शतक आहे. याआधी त्याने आशिया कप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. गिलच्या सहा वनडे शतकांमध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे.
Most International Hundreds in 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2023
Shubman Gill - 7* in 39 Innings
Virat Kohli - 5 in 22 Innings pic.twitter.com/Su3FX2iFpc
HUNDRED FOR SHUBMAN GILL...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2023
6th ODI hundred from just 35 innings, incredible consistency, the dominance by a 24-year-old in world cricket. He is moving into greatness. pic.twitter.com/QoMPZW5Lo2
गिल-अय्यरमध्ये द्विशतकी भागिदारी -
ऋतुराज गायकवाड झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शुभमन गिल आणि अय्यर दोघांनीही शतके ठोकली. अय्यर आणि गिल यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली. १६४ चेंडूमध्ये या दोघांनी द्विशतकी भागिदारी केली.
भारताची खराब सुरुवात -
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 16 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. भारताचा डाव गडगडणार की काय असेच वाटत होते. पण यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी झाली.