IND vs AUS, 1st Inning : शमीनं 4 तर अश्विन-जाडेजा जोडीनं घेतले प्रत्येकी 3 विकेट्स, 263 धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाचा डाव
IND vs AUS, 2nd Test : आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला असून त्यांचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला आहे.
IND vs AUS, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. ज्यानंतर कांगारुंचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 तर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 आणि अश्विन-जाडेजा जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत.
आतापर्यंत झालेल्या सामन्याचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक होताच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा डाव होता. त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी धावसंख्या पहिल्या डावात बोर्डवर लावली आहे. 263 धावा ही ठिकठाक धावसंख्या असून खासकरुन उस्मान ख्वाजा आणि शेवटच्या षटकांत पीटर हॅन्ड्सकॉम्ब यांनी अप्रतिम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात काही चांगल्या पार्टनरशिप्स पाहायला मिळाल्या. एकावेळी ऑस्ट्रेलिया एक मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असताना भारताचा स्टार खेळाडू जाडेजाने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर तंबूत धाडलं. अखेरच्या षटकांत हॅन्ड्सकॉम्बसोबत एक चांगली भागिदारी केली. पण 33 धावांवर कमिन्स बाद झाला. अखेर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची खेळी करत धावसंख्या किमान 250 च्या पुढे गेली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 14.4 षटकांत 60 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर अश्विन आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 21 षटकं टाकत अनुक्रमे 57 आणि 68 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
View this post on Instagram
दिल्लीत टीम इंडियाचाच दबदबा
1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता.
हे देखील वाचा-