IND vs AUS 3rd ODI LIVE: कांगारु शेवट गोड करणार की भारत क्लिन स्वीप देणार, लाईव्ह अपडेट
IND vs AUS 3rd ODI LIVE Score Updates : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे.
LIVE
Background
IND vs AUS 3rd ODI LIVE Score Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3rd ODI Match) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर (Saurashtra Cricket Association Stadium) होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी दोन्ही संघाला विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची अखेरची संधी असेल. भारतीय संघाने मालिकेत २-० च्या फरकाने आधीच बाजी मारली आहे. राजकोटच्या मैदानात (Saurashtra Cricket Association Stadium) ऑस्ट्रेलियाला (Australia cricket team) क्लिनस्वीप देऊन विश्वचषकात दिमाखात आगमन करण्यासाठी भारतीय संघ उतरेल. तर अखेरचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असेल. राजकोट येथे होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. हा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी दीड वाजता सुरु होईल. एक वाजता नाणेफेक होईल.
तिसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता किती ? Weather Forecast
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात बुधवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पण बुधवारी राजकोटमधील वातावरण कसं आहे. पावसाची शक्यत आहे. बुधवारी राजकोटमधील तापमान ३३ डग्री सेल्सिअस इतके असेल. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश ढगाळ राहील. रिमझिम पावसाचीही शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र, हवामान खात्यानुसार राजकोटमध्ये सामन्याच्या दिवशी फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन पूर्ण होईल.
लाइव स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमा अॅपवर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 आणि डीडी स्पोर्ट्स या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.
सामन्याची वेळ काय ?
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल. एक वाजता नाणेफेक होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 148 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 56 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 69 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 32 वेळा पराभव केला आहे.
शार्दूल बाहेर, हार्दिक आत -
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचे संभाव्या ११ शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचा ६६ धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाचा ६६ धावांनी विजय
भारताला नववा धक्का
रविंद्र जाडेजाच्या रुपाने भारताला नववा धक्का बसलाय.
भारताला आठवा धक्का
भारताला आठवा धक्का... बुमराह तंबूत
भारताला सातवा धक्का
भारताला सातवा धक्का... कुलदीप यादव बाद
भारताचा अर्धा संघ तंबूत
४८ धावांवर श्रेयस अय्यर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने घेतली चौथी विकेट