Ravindra Jadeja : दीर्घ काळानंतर जाडेजाची संघात दमदार एन्ट्री, अष्टपैलू प्रदर्शन करत मिळवला सामनावीराचा पुरस्कार
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना भारताने 1 डाव 132 धावांनी जिंकला असून यामध्ये अष्टपैलू रवींद्र जाडेजा याने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं.
Ravindra Jadeja Player of the match : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सुरू असून पहिला सामना नुकताच नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) पार पडला. सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन दाखवलं. दरम्यान या सर्वांमध्ये अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याने अष्टपैलू प्रदर्शन दाखवत दोन्ही डावात मिळून 7 विकेट्स घेतल्या तर एका डावात फलंदाजी करत 70 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच (Player Of the Match) हा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर मैदानात परतल्यानंतरही जाडेजानं केलेलं हे दमदार पुनरागमन वाखाणण्याजोगं आहे.
An all-round match-winning performance to mark a memorable return! 🙌🏻@imjadeja becomes the Player of the Match as #TeamIndia win by an innings & 132 runs 👏🏻
— BCCI (@BCCI) February 11, 2023
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/VBGfjqB4dZ
जाडेजाची या सामन्यातील कामगिरी पाहिली तर त्याने सर्वात आधी म्हणजे पहिल्या डावात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाची संपूर्ण मधली फळी त्याने उद्धवस्त केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आल्यावर भारताचे बरेच गडी बाद झाले असताना जाडेजाने अक्षरसोबत तुफान फटकेबाजी केली. जाडेजाने 185 चेंडूत 9 चौकार ठोकत 70 रन केले. त्याच्या या खेळीमुळे भारत एक मोठी धावसंख्या उभारु शकला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही जाडेजाने 12 ओव्हर टाकत महत्त्वाचे दोन विकेट्स घेतले. त्याच्या या संपूर्ण कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आला.
बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन
भारताचा हा स्टार अष्टपालू मागील बऱ्याच काळापासून संघात नव्हता. कोणत्याच फॉरमॅटमध्ये जाडेजा खेळत नव्हता. जाडेजा 2022 च्या आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. यानंतर तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला गेलेला टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही. त्यानंतर आता श्रीलंका, न्यूझीलंडविरुद्धही जाडेजा संघात नव्हता. पण आता ऑस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या मालिकेत जाडेजा संघात परतला असून त्याने दमदार पुनरागमन केलं आहे.
दुखापतीपूर्वी रवींद्र जाडेजाचा फॉर्म
दुखापतग्रस्त होण्यापूर्वी रवींद्र जाडेजा (Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात 50.25 च्या सरासरीनं 201 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141.54 इतका होता. तर, गोलंदाजीत जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत
हे देखील वाचा-