पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाचं सावट, काय सांगतोय हवामान अंदाज ?
IND vs AFG 1st T20 Weather Report : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
IND vs AFG 1st T20 Weather Report : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षातील पहिला टी 20 सामना खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांचं या मालिकेतून कमबॅक झालेय. दीड वर्षांनंतर हे दोन्ही स्टार खेळाडू टी 20 मालिकेत परतले आहेत. आज मोहालीमध्ये मालिकेतील पहिला टी 20 सामना होणार आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे पहिल्या टी 20 सामन्याला मुकणार आहे. पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाचे सावट आहे का ? असा सवाल चाहत्यांना सतावत आहे. पण चिंता करण्याचं कोणतेही कारण नाही, कारण मोहालीमधील वातावरण एकमद स्वच्छ आहे. पावसाची कोणताही शक्यता नाही.
अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातच रोहित आणि विराट कोहली यांनी टीम इंडियात कमबॅक केलेय. पहिल्या सामन्यासाठी विराट कोहली उपलब्ध नाही. अखेरच्या दोन सामन्यासाठी विराट कोहली संघाचा भाग असेल.
मोहालीतील आजचं वातावरण कसं असेल ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 11 जानेवारी रोजी मोहालीतील वातावरण एकदम स्वच्छ असेल. पावसाची कोणताही शक्यता नाही. दव पडण्याची शक्यताही धुसूरच आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक महत्वाची ठरणार आहे.
मोहालीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा
मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये टीम इंडियाने आतापर्यंत चार टी 20 सामने खेळले आहेत. यामधील तीन सामन्यात भारताचा विजय झालाय. तर एका सामन्यात पराभव स्वीकाराला लागलाय. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
आजपासून मालिकेला सुरुवात -
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्याची मालिका गुरुवार, 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मोहाली येथे होणार आहे. 14 जानेवारी रोजी इंदूर येथे होणार आहे. तर मालिकेतील अखेरचा सामना 17 जानेवारी रोजी बंगळुरुमध्ये होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी सात वाजता होणार आहेत.
अफगानिस्तानचा संपूर्ण संघ : इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब
अफगानिस्तान टी20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.
IND vs AFG : टी20 मालिकेआधीच अफगाणिस्तानला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर