IND U19 vs ENG U19 Final: इंग्लंडचा डाव अखेर आटोपला, भारताला विश्वचषक मिळवण्यासाठी 190 धावाचं आव्हान
U19 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 विश्वचषकाचा सामना सुरु असून इंग्लंडने पहिली फलंदाजी करत 189 धावा केल्या आहेत.
U19 World Cup 2022 : अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या (Under 19 WC) अंतिम सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने अफलातून फलंदाजी करत इंग्लंडचे 7 गडी काही धावांमध्ये तंबूत धाडलं. पण त्यानंतर जेम्स आर. (James Rew) आणि जेम्स सेल्स (34) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. ज्यामुळे त्यांनी 189 धावा केल्या आहेत. ज्यामुळे भारताला विजयासाठी 190 धावा करायच्या आहेत.
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर (Sir Vivian Richards Stadium) सुरु असलेल्या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषक मिळवण्यासाठी लढाई सुरु आहे. सामन्यात भारताच्या राज बावा याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. इतर गोलंदाजांनीही अप्रतिम गोलंदाजी केली. अवघ्या 50 धावांच्या आतच इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर दोन विकेट्सही लवकर पडल्या पण नंतर जेम्स आर. (95) याने जेम्स सेल्ससोबत जेम्स सेल्स याने इंग्लंडचा डाव सावरला. ज्यामुळे इंग्लंडने 189 धावांपर्यंत मजल मारली असून भारताला विजयासाठी 190 धावा करायच्या आहेत. भारताकडून राज बावाने 5 तर रवी कुमारने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर कौशल तांबे याने एक विकेट घेतली आहे.
सामन्यासाठी अंतिम संघ
भारत: यश धूल (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, हर्नुर सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, कौशल तांबे, दिनेश बाणा, राज बावा, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर, रवी कुमार.
इंग्लंड: टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जॉर्ज थॉमस, जेकब बिथेल, जेम्स ऱ्यू, विल्यम लक्स्टन, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस स्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन
अंडर-19 विश्वचषकामध्ये दोन्ही संघाची कामगिरी
अंडर-19 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघानं एकही सामना गमवला नाही. या दोन्ही संघांनी आपापल्या गटातील सर्व 3 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दोन्ही संघानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिलीय. यामुळं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI : टीम इंडियाची जर्सी मिळाल्यानंतर Deepak Hooda चा आनंद गगनात मावेना
- Australia Tour of Pakistan : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया जाणार पाकिस्तान दौऱ्यावर
- IND Vs WI: प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत बीसीसीआयकडून कोणतंही लेखी पत्र मिळालं नाही, सीएबी अध्यक्ष अविषेक डालमियाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha