Australia Tour of Pakistan : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया जाणार पाकिस्तान दौऱ्यावर
Australia Tour of Pakistan : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याला मंजूरी दिली आहे.
Australia Tour of Pakistan : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलिया तीन कसोटी, एक टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करत पाकिस्तान दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक जारी केलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाचा संघ इस्लामाबादमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर एक दिवसाचा विलगीकरणाचा कालवधी पूर्ण करेल. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या सहमतीनुसार, चार्टड प्लेनमधून पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ घरीच विलगीकरणाचा कालवाधी पूर्ण करेल. इस्लामाबादमध्ये एक दिवसाचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ रावळपिंडी क्रिकेट ग्राऊंडवर सराव सुरु करेल.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान चार मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे. तर एक टी-20 सामनाही होणार आहे. एकदिवसीय मालिका आणि टी20 सामना भारतात होणाऱ्या आयपीएलसोबत होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा पाच एप्रिल रोजी संपणार आहे.
Here's the full schedule! 🗓
— Cricket Australia (@CricketAus) February 4, 2022
The squads will be announced in the coming days. pic.twitter.com/BPrl6TYwaB
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक (Australia Tour of Pakistan )
4 मार्च ते 8 मार्च - पहिला कसोटी सामना, रावळपिंडी
12 मार्च ते16 मार्च - दूसरा कसोटी सामना, कराची
21मारच ते 25 मार्च - तीसरा कसोटी सामना, लाहोर
29 मार्च - पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी
31 मार्च - दूसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
2 एप्रिल - तीसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
5 एप्रिल - टी20 सामना, रावळपिंडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha