India vs New Zealand, Playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात कोणा-कोणाला मिळणार संधी? कशी असेल भारताची अंतिम 11
IND vs NZ : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दरम्यान बऱ्याच खेळाडूंचं संघात पुनरागमन झाल्याने नेमकी अंतिम 11 कशी असेल हे पाहावे लागेल.
Team India playing 11 vs New Zealand : टी20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यावेळी तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. तर यावेळी संघात बऱ्याच खेळाडूंचं पुनरागमन झाल्याने नेमकी अंतिम 11 कशी असेल हे पाहावे लागेल...
तर भारतीय संघाचा विचार करता विश्वचषक खेळलेल्या रोहित-विराट या दिग्गजांना विश्रांती दिली गेली आहे. गोलंदाजीतही शमी नसून बुमराहही दुखापतीमुळे बाहेरच आहे. अशामध्ये संजू, श्रेयस, शुभमन अशा बऱ्याच जणांचं पुनरागमन झाल्यामुळे एक नवी प्लेईंग 11 आज दिसणार आहे. यामध्ये सलामीला शुभमन आणि ईशान असू शकतात. त्यानंतर इनफॉर्म सूर्या विराटची जागा घेईल. तर चौथ्या स्थानावर श्रेयस आणि संजू यांच्यातील एकजण असेल. तर त्यानंतर कॅप्टन हार्दिक, पंत हे दिग्गज असतील. मग सुंदर आणि हुडा यांच्यातील एकजण असू शकतो. तर गोलंदाजीत चहल या एका फिरकीपटूसह अर्शदीप, उमरान आणि भुवनेश्वर हे वेगवान गोलंदाज असू शकतात.
कसे असू शकते भारताची अंतिम 11?
भारतीय संघ :
शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर/दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघाचा विचार करता ते विश्वचषकात घेऊन उतरलेल्या संघासोबतच उतरु शकतात, ज्यात काहीच बदल असू शकतात. कर्णधार म्हणून केनच असेल तर ग्लेन हा कमाल फॉर्मात असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
असा असू शकतो न्यूझीलंडचा संघ -
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
कसा आहे पिच रिपोर्ट?
वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर फलंदाजांना नेहमीच मदत मिळाली आहे, त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यातही फलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी फिरकीपटूंपेक्षा अधिक यश मिळवले आहे. पाऊस आणि ढग यांच्यामुळे वेगवान गोलंदाजांचे काम आणखी सोपे होऊ शकते. दोन्ही संघ किमान तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात.
हे देखील वाचा-