(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jasprit Bumrah : बुमराहचा बॉलने नाही तर बॅटने विश्वविक्रम, इंग्लंडविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
IND vs ENG : भारताच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नाबाद 31 धावांची फिनिशींग केल्यामुळे भारताची धावसंख्या 400 पार गेली.
Jasprit Bumrah World Record : भारतीय संघाचंसध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नेतृत्त्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एका षटकात तब्बल 35 धावा ठोकल्या असून कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. संपूर्ण सोशल मीडियावर याच षटकाची चर्चा होत असून आयसीसीनेही ट्वीट करत बुमराहचं कौतुक केलं आहे.
We did not see this one coming...#WTC23 | #ENGvIND https://t.co/PScAnSipI5
— ICC (@ICC) July 2, 2022
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामन्यातील पहिल्या डावा भारताने तब्बल 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाच्या दमदार शतकाच्या जोरावर ही धावसंख्या भारताने केली असून यावेळी भारताचा कर्णधार आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याने देखील नाबाद 31 धावांची दमदार फिनिशींग केली. भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा ठोकण्याचा विक्रम बुमराहने केला आहे. या ओव्हरमध्ये बुमराहने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.
World record alert: 35 runs in a single over - Bumrah is the hero. pic.twitter.com/B43Ic5T9mD
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2022
कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा झालेली षटकं
फलंदाज | गोलंदाज | धावा | सामना |
जसप्रीत बुमराह | स्टुवर्ट ब्रॉड | 35 | भारत विरुद्ध इंग्लंड (2022) |
ब्रायन लारा | आर पीटरसन | 28 | वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2003) |
जी बेली | जेम्स अँडरसन | 28 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (2013) |
केशव महाराज | जो रुट | 28 | दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (2020) |
हे देखील वाचा-