IND vs ENG Score Live: इंग्लंडकडून भारताचा 7 गडी राखून पराभव, मालिकाही सुटली अनिर्णीत
IND vs ENG : भारताच्या मागील इंग्लंड दौऱ्यातील उर्वरीत पाचवा कसोटी सामन्याला आजपासून इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे सुरुवात होत आहे.
LIVE
![IND vs ENG Score Live: इंग्लंडकडून भारताचा 7 गडी राखून पराभव, मालिकाही सुटली अनिर्णीत IND vs ENG Score Live: इंग्लंडकडून भारताचा 7 गडी राखून पराभव, मालिकाही सुटली अनिर्णीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/29b4d791315ddea38eb8943716a75d92_original.jpeg)
Background
India vs England Test : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील बर्मिगहम येथे या सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोरोनाबाधित झाल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील हा एकमेव कसोटी सामना आहे. मूळात हा सामना म्हणजे मागील दौऱ्यातील उर्वरीत सामना आहे. मागील वर्षी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असताना कोरोनाच्या शिरकावामुळे अखेरचा सामना खेळवता आला नव्हता. हात अखेरचा उर्वरीत कसोटी सामना आता खेळवला जात आहे.
भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली. भारताने एकूण 7 सामने या मैदानात खेळले असून 6 गमावले असून एक अनिर्णीत सुटला आहे.
कसे असू शकतात दोन्ही संघ?
भारताची संभाव्य अंतिम 11 : मयांक अगरवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
इंग्लंडचे अंतिम 11 : अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
हे देखील वाचा-
- Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार
- Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?
ENG vs IND: अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा एकहाती विजय
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात विजय मिळवून इतिहास रचण्यासाठी भारताकडून संधी हुकली. या सामन्यातील अखेरच्या दिवशी भारतानं दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं एकहाती विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या विजयानंतर मालिका 2-2 नं बरोबरीत सुटली.
इंग्लंड vs भारत, पाचवा दिवस: इंग्लंड (दुसरा डाव) - 377/3 रन (76.3 ओवर)
इंग्लंड vs भारत, पाचवा दिवस: इंग्लंड (दुसरा डाव) - 377/3 रन (76.2 ओवर)
इंग्लंड vs भारत, पाचवा दिवस: इंग्लंड (दुसरा डाव) - 373/3 रन (76.1 ओवर)
इंग्लंड vs भारत, पाचवा दिवस: इंग्लंड (दुसरा डाव) - 372/3 रन (75.6 ओवर)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)