Rishabh Pant : क्रिकेट जगतात ऋषभ पंतचीच हवा, सचिनपासून ते सौरवपर्यंत सर्वांकडून कौतुक
India vs England : बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पंतने शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
Rishabh Pant in India vs England Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंगहम येथे कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने ठोकलेल्या शतकामुळे संपूर्ण क्रिकेट जगत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. अगदी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटूपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळापर्यंत तसंच सर्वच क्रिकेटप्रेमी पंतचं कौतुक करत असून शुक्रवार रात्रीपासून ट्वीटरवर पंतचीच हवा दिसून येत आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे एकीकडे आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतत असताना पंतने जाडेजासोबत भारताचा डाव सांभाळला. सोबतच आपलं शतकही पूर्ण करत पुन्हा एकदा कसोटी सामन्यात टी20 प्रमाणे फलंदाजी केली. 89 चेंडूत पंतने शतक पूर्ण केलं. 89 चेंडूत त्याने 15 चौकार आणि एका षटकरासह 100 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर 146 धावांपर्यंत अगदी तुफानी फलंदाजी पंतने केली पण जो रुटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीने त्याला झेलबाद करत तंबूत धाडलं. पण या मोक्याच्या क्षणी पंतने ठोकलेल्या शतकाने सर्वांचीच मनं जिंकली. ज्यामुळे सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद, इरफान पठाण, बीसीसीआय सचिव जय शाह आदींचा समावेश आहे. परदेशी खेळाडू राशिद खान, मायकल वॉ अशा अनेकांनी देखील पंतचं कौतुक केलं आहे.
हे देखील वाचा-
- Rishabh Pant Record : पंतने रचला नवा विक्रम; 100 षटकार ठोकणारा सर्वात तरुण भारतीय, मास्टर ब्लास्टरला टाकलं मागे
- Virat Kohli : पुन्हा कोहली फॅन्सच्या पदरी निराशा! स्वस्तात विराट बाद; सोशल मीडियावर विविध मीम्स व्हायरल
- Anderson to Pujara : अँडरसन पुजाराची पाठ सोडेना, मालिकेतील पाचही सामन्यांच्या पहिल्या डावात धाडलं तंबूत