एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 - यजमान इंग्लंडला नमवून टीम इंडिया उपांत्य फेरी गाठणार?

पण इंग्लंड हा इतिहास बदलू शकेल? की टीम इंडियाची घोडदौड अशीच सुरु राहील? फॅब्युलस विराट कोहली आणि फॅब्युलस ज्यो रुट यापैकी कोण आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रविवारी रात्री मिळणार आहेत.

बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना उद्या यजमान इंग्लंडशी होत आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल. टीम इंडियानं बर्मिंगहॅमची ही लढाई जिंकली, तर त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होईल. पण इंग्लंडला विश्वचषकातलं आव्हान राखायचं, तर भारतीय संघाला हरवणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत आणि इंग्लंड संघांमधला हा सामना अतिशय चुरशीचा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. विराट कोहली आणि ज्यो रुट.... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या फॅब्युलस फोरपैकी दोन महत्वाचे शिलेदार. आणि हे दोघेही जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल याची उत्सुकता तमाम क्रिकेटरसिकांना लागून राहिली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघांमध्ये विश्वचषकाचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यफेरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. याचं कारण विराटसेनेची सरशी झाल्यास टीम इंडियाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल. आणि इंग्लंडला उपांत्य फेरीच्या तिकीटासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील. उभय संघांमधला हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात अपराजित असलेला एकमेव संघ आहे. आणि याचं मोठं श्रेय जातं ते कर्णधार विराट कोहलीला.  विराटनं या विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये 63.20 च्या सरासरीनं 316 धावा केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 82, पाकविरुद्ध 77, अफगाणिस्तानविरुद्ध 67 आणि वेस्ट इंडिजवरुद्ध 72 अशा सलग चार अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय कर्णधाराच्या या विराट कामगिरीप्रमाणेचं इंग्लंडसाठी ज्यो रुटची कामगिरी महत्वाची ठरली आहे.  रुटनं या विश्वचषकात सात सामन्यात 72 च्या सरासरीनं 432 धावांचा रतीब घातला आहे. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. रुटच्या या कामगिरीमुळे ऑइन मॉर्गनच्या इंग्लिश फौजेनं सातपैकी चार सामन्यांत यश मिळवलंय. त्यामुळे एजबॅस्टनवर रुटची कामगिरी इंग्लंडसाठी निर्णायक ठरेल. विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडला विजेतेपदानं वारंवार हुलकावणी दिली आहे. यावेळी मायदेशात विजेतेपदाचं ते स्वप्न साकारण्याच्या निर्धारानं इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे. पण उपांत्य फेरी इंग्लंडसाठी अजूनही लांब आहे. 1999 पासून  विश्वचषकात इंग्लंडला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. 1999 आणि 2003 साली भारतानं इंग्लंडचा मोठ्या फरकानं धुव्वा उडवला होता. तर 2011 च्या विश्वचषकातला सामना टाय झाला होता. यंदाच्या विश्वचषकातला टीम इंडियाचा ताजा फॉर्म पाहता इंग्लंडसाठी हा इतिहास बदलणं सध्यातरी कठीण वाटत आहे. पण इंग्लंड हा इतिहास बदलू शकेल? की टीम इंडियाची घोडदौड अशीच सुरु राहील? फॅब्युलस विराट कोहली आणि फॅब्युलस ज्यो रुट यापैकी कोण आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रविवारी रात्री मिळणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget