(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women's T20 WC : महिला T20 विश्वचषकानंतर 'टीम ऑफ टूर्नामेंट' जाहीर, भारताच्या एकमेव खेळाडूला स्थान, कसा आहे संपूर्ण संघ?
Team of tournament : महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यानंतर आता 'टीम ऑफ टूर्नामेंट'जाहीर करण्यात आली आहे.
ICC T20 Womens Wold Cup t20: महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी मात देत ऑस्ट्रेलियन महिलांनी विश्वचषक मिळवला. यास्पर्धेनंतर आता टूर्नांमेंटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 'टीम ऑफ टूर्नामेंट' संघात स्थान मिळालं आहे. यामध्ये केवळ एका भारतीय खेळा़डूला संधी मिळाली असून तिचं नाव म्हणजे रिचा घोष असं आहे. रिचा (Richa Ghosh) ही एक युवा यष्टीरक्षक फलंदाज आहे. संपूर्ण स्पर्धेतील तिच्या दमदार कामगिरीमुळे रिचा घोषचा ICC च्या टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे.
रिचा घोषने या विश्वचषकात आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. बॅट व्यतिरिक्त तिने संपूर्ण स्पर्धेत विकेटकीपिंगमध्येही अद्भुत कामगिरी केली. रिचा या स्पर्धेत 136 धावा करण्यात यशस्वी ठरली. तिने ही धावसंख्या फक्त 68 चेंडूत 130.76 च्या स्ट्राईक रेटने केली. याशिवाय तिने विकेटच्या मागे सात बळी घेतले. रिचा घोषने 5 झेल घेण्यासोबतच 2 स्टंपिंग केले. टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये भारताकडून समाविष्ट करण्यात आलेली ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
टीम ऑफ टूर्नामेंट
आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ताजमीन ब्रिट्स दक्षिण आफ्रिका (186 धावा), अॅलिसा हिली (विकेटकीपर) ऑस्ट्रेलिया (189 धावा), लॉरा वोल्वार्ड दक्षिण आफ्रिका (230 धावा), नॅट सिव्हर ब्रंट (कर्णधार) इंग्लंड (216 धावा), ऍशले गार्डनर ऑस्ट्रेलिया (110 धावा आणि 10 विकेट), रिचा घोष भारत (136 धावा), सोफी इक्स्टोन इंग्लंड (11 विकेट), करिश्मा रामहार्क वेस्ट इंडिज (5 विकेट), शबनिम इस्माईल दक्षिण आफ्रिका (8 विकेट), डार्सी ब्राउन ऑस्ट्रेलिया (7 विकेट), मेगन शुट ऑस्ट्रेलिया (10 विकेट) . त्याचवेळी, आयर्लंडच्या ओरला प्रेंडरगास्टचा 12वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तिने महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये 109 धावा करण्यासोबतच 3 विकेट्सही घेतल्या होत्या.
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका पराभूत
आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर 156 धावा केल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 120 चेंडूत 157 धावा करायच्या असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या सर्वाधिक आशा त्यांच्या सलामीवीरांकडून होत्या. कारण दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक यशस्वी ठरली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात हीच जोडी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवू शकत होती.. लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स ही सलामीची जोडी महिला टी20 विश्वचषकात आतापर्यंतची सर्वात यशस्वी जोडी ठरली होती. त्यांनी यंदाच्या T20 विश्वचषकात डावाची सुरुवात करताना सर्वाधिक 299 धावा केल्या होत्या. पण फायनलमध्ये मात्र ताजमिन ब्रिट्स 10 धावा करुन बाद झाली. दुसरीकडे लॉरा वोल्वार्ड हिने एक चांगली झुंज दिली. पण 61 धावाच ती करु शकली आणि संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकली नाही. क्लोई ट्रॉयनने 25 धावांची खेळी केली, पण अखेर 20 षटकांत 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकला. ज्यामुळे 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने सामना आणि विश्वचषक जिंकला.
हे देखील वाचा-