ICC POTM : आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराच्या वुमन्स कॅटेगरीत भारतीय महिलांची हवा, जेमिमासह दिप्ती शर्मा शर्यतीत
ICC Player of the month : ऑक्टोबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी महिला कॅटेगरीमध्ये दोन भारतीय महिलांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. तर त्यांच्यासोबत पाकिस्तानची निदा दार शर्यतीत आहे.
ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) ऑक्टोबर महिन्यात दमदार खेळी करणाऱ्या क्रिकेटर्सना नॉमिनेट करण्यात आलं आहे. यावेळी महिला क्रिकेटमध्ये भारतीय महिलांनी कमाल करत दोन नॉमिनेशन पटकावली आहे. त्यामुळे महिला नॉमिनेशन्समध्ये भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. या दोघींसह शर्यतीत पाकिस्तानची निदा दार (Nida Dar) नॉमिनेट झाली आहे.
नुकताच महिला आशिया चषक (Womens Asia Cup) पार पडला. या स्पर्धेत भारतानं दमदार खेळ दाखवत ट्रॉफी उंचावली. सर्वच महिलांनी चांगला खेळ दाखवला. पण युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जने काही सामन्यात केलेल्य अप्रतिम खेळीमुळे भारताला बराच फायदा झाला. तर अष्टपैलू दीप्ती शर्मा हीने बऱ्याच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली. ज्यामुळे या दोघींना नॉमिनेट करण्यात आलं आहे.
🌟 Two Women's Asia Cup champions
— ICC (@ICC) November 3, 2022
🌟 An all-round superstar
Unveiling the nominees for the ICC Women's Player of the Month for October 2022 👇#ICCPOTM
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसी (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये विचार केला तर भारताच्या विराट कोहलीला नॉमिनेट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार सुरु झाल्यानंतर विराट पहिल्यांदाच नॉमिनेट झाला आहे. कारण मागील जवळपास दोन वर्षे विराट खराब फॉर्मात होता आणि त्याच काळात हा पुरस्कार सुरु झाला. ज्यामुळे अद्याप विराट नॉमिनेट झाला नव्हता. आता तो परत फॉर्मात परतल्यामुळे थेट नॉमिनेट झाला आहे. त्याच्या सोबत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश आहे. सिकंदर हा तर झिम्बाब्वे संघासाठी कमाल अष्टपैलू खेळी करत आहे. तर मिलरही कमाल फॉर्मात आहे.
हे देखील वाचा-