ICC POTM : आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट
ICC Player of the month : आयसीसी कडून दरमहा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देण्यात येतो, यासाठी यंदा इंग्लंड संघाचे दोन तर पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट झाला आहे.
![ICC POTM : आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट ICC Player of the Month Award Shaheen afridi jos buttler and adil rashid Nominated for Mens Category ICC POTM : आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/06/ea0f24a1addcb270dbcaf3240ad30d3b1670338091130323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) दरमहिन्याला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the motnh) हा पुरस्कार देण्यात येतो. महिन्याभरात विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये दमदार कामिगिरी करणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या या पुरस्कारासाठी यंदाही तीन खेळाडूंनाै नॉमिनेट करण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाचा विजेता संघ इंग्लंडचे (England) दोन खेळाडू तर उपविजेत्या पाकिस्तानच्या एका खेळाडूला नॉमिनेट केलं गेलं आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) फिरकीपटू आदिल रशिद (Adil Rashid) आणि पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांचा समावेश आहे.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या या विजयाचे हिरो कर्णधार जोस बटलर आणि आदिल रशीद तसंच बेन स्टोक्ससारखे खेळाडू होते. यामुळे जोस बटलर आणि आदिल रशीद हे यंदाच्या ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याशिवाय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 2022 चा टी20 विश्वचषक चांगलाच गाजवला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात शाहीनला दुखापत झाल्याने पूर्ण षटके टाकता आली नाहीत. तरी तो देखील पुरस्काराचा तगडा दावेदार नक्कीच आहे.
View this post on Instagram
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आयसीसीनं (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानची सिद्रा अमीन, थायलंडची नथकन चंथम आणि आयर्लंडची गॅबी ल्यूईस यांना नामांकित करण्यात आलं आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)