एक्स्प्लोर

New T20I Coach : टीम इंडियाला लवकरच मिळू शकतो नवा टी20 कोच, राहुल द्रविडची जागा धोक्यात, धोनीचं नाव चर्चेत

T20I New Coach: टीम इंडियाला टी20 फॉर्मेटसाठी लवकरच नवा प्रशिक्षक मिळू शकतो. सध्या राहुल द्रविड हाच तिन्ही फॉर्मेसाठी कोच म्हणून कार्यरत आहे.

Team India : आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या (ICC T20 World Cup 2022) उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर तसंच मोठ्या स्पर्धांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुन्हा एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीयकडून भारताचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याला टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदावरून (Team India t20 team Coach) हटवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या टी20 संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सूत्राने इनसाइडस्पोर्टला दिलेल्या माहितीत सांगितले की, 'आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविड व्यस्त वेळापत्रकामुळे टी-20 संघाचा प्रशिक्षक बदलण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय टी20 संघाला लवकरच नवीन कोच मिळू शकतो. बीसीसीआयनं कोणाकडे टी-20 प्रशिक्षकपद सोपवणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, या पदासाठी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) नाव पुढे येत आहे.

कर्णधार म्हणूनही हार्दिकला संधी मिळण्याची शक्यता

बीसीसीआयच्या एका सूत्राने यापूर्वी माहिती देताना सांगितले होते की, 'रोहित शर्मा कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहितकडे सध्या खूप जबाबदारी आहे. त्यामुळे टी20 कर्णधारपदाचा भार हलका करण्याची गरज आहे. तसंच बीसीसीआयला आतापासूनच 2024 टी-20 विश्वचषकाची तयारी करावी लागेल. या भूमिकेसाठी हार्दिक फिट आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पांड्याला टी-20 चा कर्णधार म्हणून अधिकृतपणे घोषित केले जाऊ शकते. तसंच लक्ष्मण, शास्त्री असे माजी दिग्ग क्रिकेटर सतत हार्दिकची शिफारस करत आहेत. तसच नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये  असा दावा करण्यात आला आहे की बोर्ड लवकरच हार्दिकला नवीन टी-20 कर्णधार म्हणून घोषित करू शकते. रोहित शर्माचे वाढते वय आणि तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी पाहता हा बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेपूर्वीच हार्दिकला कायमस्वरूपी कर्णधारपद मिळू शकते.

हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget