एक्स्प्लोर

Ind vs Aus : मिश्या फुटल्या नाही पण किंग कोहलीशी भिडला, बॉक्सिंग-डे कसोटी जोरदार वादावादी, अंपायर आला अन्.... पहा Video

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे खेळला जात आहे.

Virat Kohli Sam Konstas Clash On Field : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे खेळला जात आहे. हा सामना आजपासून (26 डिसेंबर) सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पहिल्या तासात पूर्णपणे योग्य ठरला. याचे संपूर्ण श्रेय सॅम कॉन्स्टासला जाते, ज्याने या सामन्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकले. 

या 19 वर्षीय फलंदाजाने आपल्या तुफानी फलंदाजीने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना जबरदस्त चौकार आणि षटकार ठोकले. पण चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सॅम कॉन्स्टास चौकार आणि षटकार मारत असताना तो विराट कोहलीसमोर आला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर, ऑस्ट्रेलियन डावाच्या 10व्या षटकात ही घटना घडली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कॉन्स्टासने 1 रन काढला. ओव्हर संपल्यानंतर विराट कोहली चालताना ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजाला जाऊन धडकला. त्यानंतर कॉन्स्टासनेही कोहलीला प्रत्युत्तर म्हणून पाहण्यास सुरुवात केली. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा कॉन्स्टास चांगल्या तुफानी शैलीत फलंदाजी करत होता.

विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यातील वादाला वाढण्यापूर्वीच पंचांनी हस्तक्षेप केला. कॉन्स्टसचा साथीदार उस्मान ख्वाजा यानेही त्याला समजावून सांगितले. त्याच इनिंगमध्ये मोहम्मद सिराजने 19 वर्षीय कॉन्स्टासची स्लेजिंग केली होती, त्यानंतर त्याने बरेच चौकार आणि षटकार मारले होते. या मालिकेत जसप्रीत बुमराह सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 21 विकेट घेतल्या आहेत, मात्र जसप्रीत बुमराहच्या एकाच षटकात त्याने 18 धावा ठोकल्या त्यावेळी संपूर्ण टीम इंडियाला चकित केले.

60 धावांची इनिंग खेळून आऊट

सॅम कॉन्स्टास त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खूप आत्मविश्वासाने दिसला, ज्यामध्ये त्याने या मालिकेत आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला 2 षटकार ठोकले. सॅमने टी-20 क्रिकेट शैलीत फलंदाजी केली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अवघ्या 52 चेंडूत पूर्ण केले. तो 65 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 60 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सॅम हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus 4th Test : 19 वर्षाच्या पोरानं चौकार-षटकारांचा पाऊस पाडला, भारतीय गोलंदाजांना रडवलं, पदार्पण सामन्यात ठोकले तुफानी अर्धशतक, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Salman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special ReportMNS च्या Mahayuti तल्या एन्ट्रीला शिंदेंकडून ब्रेक? भाजप मनसेला दत्तक घेणार? Special ReportDhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special ReportMahamudde Mumbai Highway : प्रवास उपेक्षितच, मुंबई-अहमदाबाद महामार्गाची अवस्था पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget