एक्स्प्लोर

ICC Injury Rules : ऋषभ पंतमुळे कसोटी क्रिकेटमध्ये होणार 'क्रांतिकारी' बदल; नव्या नियमाबाबत चर्चा सुरू; महत्त्वाची अपडेट आली समोर

मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली.

ICC may approve replacements for external injuries in Test Cricket : मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली. दुखापत इतकी होती की त्याला तात्काळ मैदानाबाहेर न्यावं लागलं. यानंतर क्रिकेटमध्ये ‘लाइक-टू-लाइक’ रिप्लेसमेंटचा मुद्दा जोरात चर्चेत आला आहे. अनेक तज्ज्ञ आणि चाहत्यांचं मत आहे की, मैदानावर झालेल्या गंभीर दुखापतीसाठी संघाला दुसरा खेळाडू मिळाला पाहिजे. विशेष म्हणजे आता आयसीसीदेखील या सूचनेवर विचार करत असल्याची माहिती समोर येते आहे.

दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने दुखापतीसह फलंदाजी केली. चाहत्यांनी त्याच्या जिद्दीचं कौतुक केलं, पण खरंतर भारताला ही जोखीम घेणं भाग पडलं. कारण सध्याच्या नियमानुसार, सबस्टिट्यूट खेळाडूंना केवळ क्षेत्ररक्षणाची परवानगी आहे, ते फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाहीत.

नियमात लवकरच होणार बदल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्षाअखेरीस आयसीसी हा नियम बदलू शकते. नव्या प्रस्तावित नियमांनुसार, ज्या प्रकारचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, त्याच प्रकारच्या खेळाडूला रिप्लेसमेंट म्हणून मैदानात उतरवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याबद्दल एका सूत्राने सांगितले की, “संभावना आहे की गंभीर दुखापतीसाठी संघांना तत्काळ रिप्लेसमेंट देण्याची परवानगी दिली जाईल. ही बाब सध्या चर्चेत आहे आणि आगामी आयसीसी क्रिकेट कमिटीच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो.”

आधीच ट्रायलची घोषणा

याआधी जूनमध्येच आयसीसीने ‘रिप्लेसमेंट प्लेयर’ कंडिशनचा ट्रायल केला जाईल असं जाहीर केलं होतं. त्यात असं स्पष्ट करण्यात आलं की, “सामना सुरू झाल्यानंतर (प्री-मॅच वॉर्मअपसहित) जर एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली, तर उर्वरित सामन्यासाठी त्याच दर्जाचा दुसरा खेळाडू त्याच्या जागी येऊ शकतो.”

माइकल वॉनचा पाठिंबा

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याबाबतीत नेहमीच स्पष्ट भूमिका घेत आला आहे. दोन महिन्यांपूर्वी बीबीसीशी बोलताना तो म्हणाला होता, “जर पहिल्या डावात एखाद्या खेळाडूला खरी दुखापत झाली, तर त्याचा रिप्लेसमेंट मिळाला पाहिजे. प्रेक्षक पैसे देऊन सामना पाहायला येतात, तेव्हा त्यांना संपूर्ण अनुभव मिळायला हवा. त्यामुळे पहिला डाव हे एक योग्य कटऑफ ठरू शकतो.”

थोडक्यात, ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या जुन्या नियमांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत, आणि आता आयसीसीकडून बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. जर हे नियम बदलले, तर भविष्यात कोणत्याही संघाला दुखापतीच्या प्रसंगी चांगला पर्याय मिळू शकतो.

हे ही वाचा -

Tilak Varma News : रोहित शर्माच्या लाडक्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये धमाका, वादळी खेळी खेळत ठोकले दुसरे शतक

किरण गणपत महानवर हे मूळचे पुण्याचे असून, त्यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात सकाळमधून केली. सकाळमध्ये सुमारे अडीच वर्षे मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव व कौशल्य विकसित केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. क्रीडा पत्रकारिता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. 

गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. यामध्ये फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, महिला क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे विविध देशांतील दौरे आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र केसरी, प्रो कबड्डी लीग आणि हॉकीसारख्या स्पर्धांचेही त्यांनी वार्तांकन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आवड, लेखनशैली आणि डिजिटल माध्यमांमधील अनुभव यांच्या जोरावर ते वाचकांपर्यंत रोचक, अचूक आणि माहितीपूर्ण बातम्या व अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती योग्य वेळी पोहोचवणे याला त्यांचे विशेष प्राधान्य असते.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
Mumbai Indians Captain News : मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
IND vs NZ 2nd Test Day 1 Stump : कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget