Tilak Varma News : रोहित शर्माच्या लाडक्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये धमाका, वादळी खेळी खेळत ठोकले दुसरे शतक
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धा देखील सुरू आहे.

Tilak Varma Debut County Championship 2025 : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धा देखील सुरू आहे. भारताचे काही खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यात तिलक वर्मा देखील खेळत आहे. तिलक वर्माने या वर्षी हॅम्पशायर क्रिकेट क्लबकडून काऊंटीमध्ये पदार्पण केलं आणि आता त्याने आपलं दुसरं शतकही ठोकलं आहे.
हॅम्पशायरसाठी दमदार खेळी
2022 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवत आहे. 22 जून 2025 रोजी त्याने हॅम्पशायरकडून आपला पहिला सामना खेळला होता. त्यामध्ये त्याने 241 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या होत्या, ज्यात 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता.
22 जुलैपासून हॅम्पशायर आणि नॉटिंगहॅमशायर यांच्यात सामना सुरू झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना नॉटिंगहॅमशायरने 578 धावांवर डाव घोषित केला. लिंडन जेम्सने नाबाद 203 धावा केल्या, तर झॅक हायनेसने 103 धावांची खेळी साकारली.
Tilak Varma doing what he does best. The highlights of his classy century against Nottinghamshire pic.twitter.com/bjFDBo5zUB
— Rothesay County Championship (@CountyChamp) July 25, 2025
तिलक वर्माने पुन्हा ठोकलं शतक
तिसऱ्या दिवसाखेरीस हॅम्पशायरने 6 गडी गमावून 367 धावा केल्या. तिलक वर्माने संयमी पण ठाम खेळी करत 256 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. ही त्याची काऊंटी चॅम्पियनशिपमधील दुसरी शतकी खेळी आहे. हॅम्पशायर टीम सध्या डिव्हिजन-1मध्ये खेळते. 9 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभव, तर उरलेले सामने अनिर्णीत राहिले. त्यामुळे सध्या हॅम्पशायर 7व्या स्थानावर आहे.
तिलक वर्मा क्रिकेट कारकीर्द
तिलक वर्माने भारतासाठी एकदिवसीय आणि टी-20 स्वरूपात पदार्पण केले आहे, त्याने 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 68 धावा आणि 25 टी-20 सामन्यांमध्ये 749 धावा केल्या आहेत. तिलकने टी-20 मध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. याशिवाय, तिलक वर्माने 20 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 31 डावांमध्ये 1407 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 शतके आणि 5 अर्धशतके आहेत. तिलकने आयपीएलसह एकूण 119 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 6858 धावा आहेत. तिलक वर्मा सध्या भारताचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहे. काऊंटीमधील त्याची ही कामगिरी भविष्यातील कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.
हे ही वाचा -





















