(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Champions Trophy 2025 : ICC ने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम; चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलनं करा, थेट आदेश दिला...
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी आयसीसीची बैठक होणार आहे.
ICC Champions Trophy 2025 Hybrid Model : चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी आयसीसीची बैठक होणार आहे. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर या शेड्यूलची घोषणा लांबणीवर पडली आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 2025 हंगामासाठी एक हायब्रिड मॉडेलचा प्रस्तावित तयार केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेळोवेळी सांगितले आहे की, ते हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नाही. सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील.
परंतु ताज्या माहितीनुसार, हायब्रीड मॉडेलमध्ये पाकिस्तानमध्ये 10 सामने आणि दुसऱ्या देशात पाच सामने खेळवले जातील, ज्यामध्ये सेमीफायनल आणि फायनलचाही समावेश असेल. पीसीबीला शांत करण्यासाठी संभाव्य तडजोड म्हणून आयसीसीने हायब्रीड मॉडेलच्या शेड्यूलमध्ये भारत जर अंतिम चारसाठी किंवा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही तर सामने पाकिस्तानमध्येच होती. आयसीसीची ही योजना तणाव कमी करू शकते, परंतु यामुळे लॉजिस्टिक आव्हाने वाढतील. अशा परिस्थितीत आयसीसी पीसीबीला काही सवलत देऊ शकते.
पाकिस्तानने आयसीसीला सहमती न दिल्यास त्याच्याकडून यजमानपद काढून घेतले जाईल. अशा परिस्थितीत यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विंडो दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे अनुकूल हवामान पण चांगले असते, त्यामुळे आयसीसीकडे तो पण एक पर्याय आहे.
अहवालानुसार, ICC बोर्डाचे बहुतेक सदस्य हायब्रिड सोल्यूशनला समर्थन देत आहेत. अशा परिस्थितीत मतदान केले जाऊ शकते आणि यामध्ये बीसीसीआयचा हात असेल, आयसीसीने पीसीबीला आधीच स्पष्ट केले आहे की भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होऊ शकत नाही, कारण यामुळे आयसीसीचे नुकसान होईल. भारताला स्पर्धेतून काढून टाकल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पाकिस्तानची प्रतिमा तसेच कोट्यवधी डॉलर्स पणाला लागल्याने तडजोड हाच एकमेव उपाय असू शकतो.
पीसीबीला मोठा धक्का
अहवालात म्हटले आहे की, पीसीबी प्रस्ताव लवकर स्वीकारण्याची शक्यता नाही, परंतु आयसीसी बोर्डाने हा प्रस्ताव दिल्यामुळे पाकिस्तान बोर्डाकडे दबावापुढे झुकण्याशिवाय पर्याय नाही. पीसीबीने हा प्रस्ताव फेटाळला तर आयसीसी संपूर्ण स्पर्धा दुसऱ्या देशात हलवण्याचा विचारही करू शकते, ज्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढतील. आयसीसीने भारताचे सामने कोठे आयोजित करायचे हे अद्याप ठरवलेले नाही. दुबई आणि अबू धाबी हे दोन संभाव्य पर्याय आहेत.
हे ही वाचा -