एक्स्प्लोर

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला; अवघ्या 5 चेंडूत सामना जिंकला, सर्वांना आश्चर्याचा धक्का

Mangoliya vs Singapur World Record: मंगोलिया आणि सिंगापूर यांच्यात आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळवण्यात आला.

Mangoliya vs Singapur T20 Match: टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये विविध विक्रम रचत असतात. एका षटकांत सहा षटाकर देखील टी-20 मध्ये पाहायला मिळाले. तसेच 20 षटकांत 300 धावांचा टप्पा देखील अनेक संघांनी ओलांडला आहे. याचदरम्यान आता एक नवीन विक्रम टी-20 फॉरमॅटमध्ये नोंदवला गेला आहे.

मंगोलिया आणि सिंगापूर (Mangoliya vs Singapur) यांच्यात आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मंगोलियाचा संपूर्ण संघ केवळ 10 धावांवर बाद झाला. सिंगापूरच्या संघाने डावातील पहिल्या षटकांच्या पाच चेंडूंचा सामना करत सामन्यात विजय मिळवला. मंगोलियाकडून फक्त दोन फलंदाजांनी सर्वाधिक दोन धावा केल्या.

सामन्यात नेमकं काय घडलं?

मंगोलिया आणि सिंगापूर यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा आश्चर्यकारक इतिहास रचला गेला. या सामन्यात मंगोलियाचा संघ 10 षटकात केवळ 10 धावा करत सर्वबाद झाला. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मंगोलियाने प्रत्येक षटकात 1 धावा केल्या आणि 1 विकेट गमावली. मंगोलिया संघाचे एकूण 5 फलंदाज एकही धाव न करताच माघारी परतले. मंगोलिया संघाने एकही चौकार लगावला नाही. संघाच्या एकूण 4 फलंदाजांनी केवळ 01-01 अशा धावा केल्या.

सिंगापूरचा प्रथम फलंदाजीचा निर्णय-

सिंगापूरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सिंगापूरकडून हर्ष भारद्वाजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. याशिवाय अक्षय पुरीने 2 विकेट्स घेतल्या. राहुल शेषाद्री आणि रमेश कालिमुथू यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्ष भारद्वाजने 4 षटके टाकली, त्यापैकी दोन षटक निर्धाव होते.  याशिवाय अक्षय पुरीने 4 षटके टाकली. यामध्ये एक निर्धाव षटक होते. 

लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 5 चेंडूत सामना जिंकला-

मंगोलिया संघाला अवघ्या 10 धावांत सर्वबाद केल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सिंगापूर संघाने 5 चेंडूत 13 धावांवर एक विकेट्स गमावत विजय मिळवला. यादरम्यान संघाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार मनप्रीत सिंगची (0) विकेट गमावली. त्यानंतर विल्यम सिम्पसनने 2 चेंडूत नाबाद सहा धावा आणि राऊल शर्माने 2 चेंडूत नाबाद 7 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 

ट्रॅव्हिस हेडचा नवीन विक्रम-

ट्रॅव्हिस हेडने स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो आता मार्कस स्टॉइनिसच्या बरोबरीत पोहोचला. ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 12 चौकार आणि 5 षटकार टोलावले. दुसरीकडे, मिचेल मार्शने आपल्या डावात केवळ 12 चेंडूंचा सामना केला. मात्र या छोट्या खेळीत मिचेल मार्शने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. 

संबंधित बातम्या:

6 षटकांत तब्बल 113 धावा चोपल्या...; 9 षटकांत खेळ संपवला, पुन्हा 'हेड' नडला, ऑस्ट्रेलियाचा भीमपराक्रम

Umpire एका सामन्यासाठी किती पैसे घेतात?, एकूण पगार किती?; अनिल चौधरींनी केला खुलासा, एमएस धोनीवरही केलं भाष्य

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Embed widget