हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा; नताशा स्टॅनकोव्हिच मुंबईहून निघाली, सोबत मुलगाही दिसला!
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आहे.
![हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा; नताशा स्टॅनकोव्हिच मुंबईहून निघाली, सोबत मुलगाही दिसला! Hardik Pandya Wife Natasha Stankovic left Mumbai along with her son spot in mumbai airport हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा; नताशा स्टॅनकोव्हिच मुंबईहून निघाली, सोबत मुलगाही दिसला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/17/9e3c48844371b2a88c49a3ce19e2d3dc1721208379347987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल, मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद, पत्नी नताशा मपासून (Natasha Stankovic) घटस्फोट, टी-20 विश्वचषक आणि आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांक अशा घटनांमुळे हार्दिक पांड्याच्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान नताशा आज (बुधवारी 17 जुलै) सकाळी मुलगा अगस्त्यसह मुंबई विमानतळावर दिसली. विमानतळावर जाण्यापूर्वी नताशाने इन्स्टाग्रामवर कुठेतरी जाण्याबाबत इशारा दिला होता. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बॅगचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की ही वर्षातली ती वेळ आहे. नताशा मुलासह परदेशी गेली असल्याचं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा-
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. हार्दिक पांड्या सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियासाठी हार्दिकची चमकदार कामगिरी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घटस्फोटाच्या बातम्यांमुळे तो सतत चर्चेत असतो. टी-20 विश्वचषकात हार्दिक टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा ठरला.
नताशा स्टॅनकोव्हिचची संपत्ती किती?
नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट झालाच तर हार्दिकची किती संपत्ती नताशाला मिळणार? असंही विचारलं जातंय. या दाम्पत्याचा घटस्फोट होणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. हार्दिक आणि नताशा या दोघांनीदेखील यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र घटस्फोटाच्या चर्चेमुळे नताशाकडे एकूण किती संपत्ती आहे, असं विचारलं जातंय. खरं म्हणजे नताशा करोडपती असल्याचं सांगितलं जातं. नताशा ही एक सायबेरीयन मॉडेल आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांनी 2020 साली लग्नगाठ बांधली. नताशा स्टॅनकोविक ही 32 वर्षांची आहे. ती मॉडेलिंग, अभिनयासह अनेक ब्रँड्सची जाहिरातही करते. अनेक जाहिरातींमध्येही तिने अभिनय केलेला आहे. स्पोर्ट तक या क्रीडाविषयक वृत्तसंकेतस्थळानुसार नताशाची एकूण संपत्ती ही 20 कोटी रुपये आहे. नताशा आणि हार्दिक या दोघांची 2018 साली एका पार्टीमध्ये भेट झाली होती.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'
हार्दिक पांड्यासोबत फोटो टाकताच प्रसिद्धीच्या झोतात आली; कोण आहे प्राची सोलंकी?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)