Hardik Pandya: हार्दिक पांड्यानं ठरवलं असतं तर नातं टिकलं असतं? नताशा स्टॅनकोविकचं घटस्फोटावर मोठं वक्तव्य, म्हणाली...
Hardik Pandya Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाचं कारण समोर आलं आहे.
![Hardik Pandya: हार्दिक पांड्यानं ठरवलं असतं तर नातं टिकलं असतं? नताशा स्टॅनकोविकचं घटस्फोटावर मोठं वक्तव्य, म्हणाली... Hardik Pandya and Natasa Stankovic divorced last month but one habit of Pandya reason for separation claimed by reports Hardik Pandya: हार्दिक पांड्यानं ठरवलं असतं तर नातं टिकलं असतं? नताशा स्टॅनकोविकचं घटस्फोटावर मोठं वक्तव्य, म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/25/81f0630a0ecdff7e1c81f27075d87d7b1724605543245989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya Natasa Divorce: टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक या दोघांनी घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या मागं नेमकं कोणतं कारण होतं हे अधिकृत रित्या समोर आलेलं नाही. मात्र, एका रिपोर्टनुसार नताशा स्टॅनकोविकनं याबाबत स्वत: भाष्य केलं आहे. हार्दिक पांड्यानं त्याची एक सवय बदलली असती तर नातं वाचलं असतं, असं नताशा म्हणाली. मात्र, ती सवय कोणती होती याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही किंवा याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
टाइम्स नाउ च्या एका बातमीनुसार हार्दिक पांड्याला झगमगट असणारी जीवनशैली आवडत होती. मात्र, नताशा स्टॅनकोविकला ते योग्य वाटत नव्हती. ती हार्दिकला योग्य प्रकारे हाताळू शकली नाही. यामुळं दोघांमध्ये अंतर पडत गेलं आणि हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं घटस्फोट घेतला. नताशा स्टॅनकोविकनं हार्दिक पांड्याशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तिला यश आलं नाही.दुसरीकडे हार्दिकनं स्वत:मध्ये बदल केले नाहीत. हेच दोघांचं वेगळं होण्याचं कारण असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हार्दिक पांड्यानं जर त्याच्या वर्तणुकीत बदल केला असता तर त्यांचं नातं वाचलं असतं, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याची झगमटाची जीवनशैली त्याच्या नात्यापेक्षा वरचढ ठरली. नताशा स्टॅनकोविकला शांततामय जीवन आवडत असे.ते हार्दिक पांड्याच्या जीवनशैली तिला पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळं हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचं नातं तुटलं. नताशासाठी हा निर्णय अवघड होता. मात्र, हा निर्णय एका दिवसात किंवा आठवड्यात झालेला नसून हळू हळू वाढत असलेल्या अंतरानं दोघांना हा निर्णय घेण्यास पाडलं, असा दावा करण्यात आला आहे.
हार्दिक पांड्या त्याचं आणि नताशा स्टॅनकोविकचं नातं तुटण्याच्या मार्गावर असल्यानं त्रस्त होता. त्याचा परिणाम त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर पाहायला मिळाला. हार्दिक पांड्या नेतृत्त्व करत असलेल्या मुंबई इंडियन्सची कामगिरी देखील समाधानकारक झाली नाही. आयपीएल सुरु असताना त्याला ट्रोल केलं गेलं. मात्र, हार्दिक पांड्यानं दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला टी 20 वर्ल्ड कप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इतर बातम्या :
Sanju Samson : चेन्नई-राजस्थानची मोठी डील? IPL 2025 साठी CSK संजूला घेणार अन् 'या' खेळाडूला सोडणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)