Sanju Samson : चेन्नई-राजस्थानची मोठी डील? IPL 2025 साठी CSK संजूला घेणार अन् 'या' खेळाडूला सोडणार?
Sanju Samson To Play For CSK In IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघ संजू सॅमसनला सामील करण्याची तयारी करत आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.
Sanju Samson IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये एक मेगा लिलाव होणार आहे, जिथे संघांमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. याआधीही अशी माहिती समोर येत आहे, जी जाणून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन येत्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होऊ शकतो, असे वृत्त समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज या स्टार क्रिकेटरला ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्या ताफ्यात घेणार आहे. मात्र, संजूच्या बदल्यात राजस्थानने त्यांचा स्टार खेळाडू मागितला आहे.
संजू सॅमसन चेन्नईत होऊ शकतो सामील
चेन्नई सुपर किंग्जमध्ये येत्या हंगामात बदल होतील असे मानले जात आहे. ताज्या अहवालात माहिती समोर आली आहे, त्यानुसार चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2025 मध्ये यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला सामील करण्याचा विचार करत आहे. असे सांगण्यात येत आहे की, चेन्नईला संजू सॅमसनला ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्या संघात सामील करायचे आहे.
खरंतर, महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2025 पूर्वी निवृत्ती घेऊ शकतो असे वृत्त आहे. आता जर तो निवृत्त झाला तर चेन्नईला अनुभवी यष्टिरक्षकाची गरज भासेल आणि सॅमसन हा उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे, जो सीएसकेसाठी योग्य पर्याय ठरू शकतो हे सर्वांना माहीत आहे.
राजस्थान रॉयल्सने स्टार अष्टपैलू खेळाडूची केली मागणी
चेन्नई सुपर किंग्ज संघ राजस्थान रॉयल्समधील खेळाडूंची ट्रेडिंगद्वारे देवाणघेवाण करू शकतो. एकीकडे चेन्नईला संजू सॅमसनचा समावेश करायचा आहे. रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या बदल्यात शिवम दुबेला मागितले आहे. राजस्थान रॉयल्स चेन्नईशी केवळ पैशासाठी व्यवहार करू इच्छित नाही, असे सांगण्यात येत आहे. राजस्थानने सॅमसनच्या जागी शिवम दुबेची मागणी केली आहे. आता हा करार चेन्नई आणि राजस्थानमध्ये होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, आतापर्यंत चेन्नई आणि राजस्थानकडून या वृत्तांना दुजोरा मिळालेला नाही.
हे ही वाचा :