Happy Birthday Sunil Gavaskar : क्रिकेटपटू नाही मच्छिमार झाले असते सुनील गावस्कर, नक्की काय घडलं? भन्नाट किस्सा जाणून घ्या...
Happy Birthday Sunil Gavaskar : माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. गावस्करांसोबत रुग्णालयात एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली असती.
Little Master Sunil Gavaskar : माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज 74 वाढदिवस आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना लोक 'लिटील मास्टर' या नावाने ओळखतात. सुनील गावस्कर यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे सुनील गावसकर हे पहिले फलंदाज होते. गावस्कर यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात तीन शतके झळकावणारे पहिले फलंदाज ठरले होते.
सुनील गावस्कर यांच्या आयुष्यातील काही किस्से त्यांनी सांगितले आहेत. त्याचा जन्म झाला तेव्हा रुग्णालयात त्यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली होती. या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असती आणि ते क्रिकेटपटू ऐवजी मच्छिमार बनले असते. नक्की काय घडलं होतं जाणून घ्या...
सुनील गावस्कर यांच्या आयुष्यातील भन्नाट किस्सा
सुनील गावस्कर यांच्या आयुष्यातील हा किस्सा फार कमी लोकांना ठाऊक आहे. गावस्कर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर ऑटोबायोग्राफी लिहिली आहे. गावस्कर यांनी 'सनी डेज' (Sunny Days) या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांच्या जन्मावेळीचा एक किस्सा सांगितला आहे. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा रुग्णालयात नर्सने चुकून गावस्कर यांना एका मच्छिमाराशेजारी झोपवलं होतं. पण, त्याच्या काकांमुळे ही चूक उघडकीस आली आणि नंतर गावस्कर क्रिकेटपटू झाले.
...तर मच्छिमार झाले असते सुनील गावस्कर
ही गोष्ट सुनील गावसकर यांच्या जन्माच्या वेळची आहे. गावसकर यांनी त्यांच्या 'सनी डेज' या आत्मचरित्रात सांगितलं आहे की, जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा नर्सने त्यांना चुकून एका मच्छीमारजवळ झोपवलं, पण काकांमुळे ते वाचले. जर, त्यावेळी गावस्कर यांच्या काकांच्या तीक्ष्ण नजरेमुळे त्यांचं आयुष्य वाचलं, नाहीतर लहानपणीचे आई-वडीलांपासूनही वेगळे झाले असते आणि ते क्रिकेटपटू ऐवजी मच्छिमार झाले असते.
नक्की काय घडलं?
सुनील गावस्करांचा जन्म झाल्यावर त्यांचे काका नारायण मसुरकर त्यांना भेटायला रुग्णालयात आले होते, त्यावेळी त्यांनी गावस्करांच्या कानावरील जन्मखून पाहिली होती. दुसऱ्या दिवशी त्यांचे काका पुन्हा दवाखान्यात आले आणि त्यांनी गावस्करांना हातात उचललं. यावेळी त्यांना बाळाच्या कानावरची जन्मखून दिसली नाहीत. यानंतर संपूर्ण रुग्णालयातील बाळांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ते एका मच्छिमाराच्या पत्नीजवळ झोपलेले सापडले.
संबंधित इतर बातम्या :