Happy Birthday Shikhar Dhawan: हॅप्पी बर्थडे गब्बर! 'शिखर' गाठणाऱ्या धवनबाबत खास गोष्टी माहिती आहेत का?
Happy Birthday Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Happy Birthday Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत. धवनला क्रिकेट जगतात 'गब्बर' या टोपण नावानंही ओळखलं जातं. त्याचा जन्म आजच्या दिवशी 5 डिसेंबर 1985 साली राजधानी दिल्लीत झाला. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. 'शिखर' गाठणाऱ्या धवनबाबत खास गोष्टी आज आपण जाणून घेऊयात.
धवननं 2004 साली दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यादरम्यान, त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 122 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आणि 202 डावांमध्ये 44.3 च्या सरासरीनं एकूण 8 हजार 499 धावा केल्या. यात 25 शतक आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट व्यतिरिक्त, त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केलीय. त्यानं लिस्ट ए क्रिकेटच्या 273 सामन्यातील 269 डावात 45.3 च्या सरासरीने 11 हजार 229 धावा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धवननं 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालीय. या सामन्यात शिखरला काही खास कामगिरी करता आली नाही. क्लिंट मॅक्युनं त्याला शून्यावर बाद केलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी आणि 2013 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शिखरनं भारतासाठी आतापर्यंत 34 कसोटी सामने आणि 145 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर, 68 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं कसोटीच्या 58 डावात 40.6 च्या सरासरीनं 2 हजार 315 धावा केल्या आहे आणि एकदिवसीय 145 सामन्यातील 142 डावांमध्ये 45.5 च्या सरासरीने 6105 धावा केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटच्या 66 डावात त्यानं 27.9 च्या सरासरीनं 1 हजार 759 केल्या आहेत.
धवनला नुकतेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात धवनला हा पुरस्कार प्रदान केला. स्टार क्रिकेटरशिवाय इतर अनेक खेळाडूंनाही अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. यामध्ये एकूण 35 खेळाडूंचा सहभाग होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-