Mohammad Hafeez Retires: पाकिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद हाफिजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Mohammad Hafeez Retires: आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला तरीही तो फ्रँचायझी क्रिकेट खेळणार असल्याचं त्यानं एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलंय.
Mohammad Hafeez announced his retirement from international cricket: पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mohammad Hafeez Retired From International Cricket) जाहीर केली आहे. यासह हाफिजची 18 वर्षांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला तरीही तो फ्रँचायझी क्रिकेट खेळणार असल्याचं त्यानं एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलंय.
"मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अभिमानानं आणि समाधानानं अलविदा म्हणतोय. माझ्या कारकिर्दीत मी बरंच काही मिळवलंय. यासाठी मी माझे सर्व सहकारी क्रिकेटपटू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे", असं हाफिजनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
2003 मध्ये पदार्पण करणाऱ्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूनं पाकिस्तानकडून एकूण 392 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं 55 कसोटी, 218 एकदिवसीय आणि 119 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलंय. ज्यात त्यानं 12 हजार धावा आणि 253 विकेट्स घेतले आहेत. त्यानं तीन एकदिवसीय विश्वचषक आणि सहा टी-20 विश्वचषकांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
पीसीबीचं ट्वीट-
हाफीजनं त्याच्या यशस्वी कारकीर्दीत 32 सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेटपटूंनी मिळवलेल्या सर्वाधिक पुरस्कारांचा यादीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. पाकिस्तानकडून सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत शाहिद आफ्रिद अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 43 पुरस्कार जिंकल्याची नोंद आहे. त्यानंतर वसीम अक्रमनं 39 तर, इंधमाम-उल-हकनं 33 पुरस्कार जिंकले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha