IND vs SA : ऋतुराज-अक्षरचं अंतिम 11 मधून बाहेर होणं जवळपास निश्चित, उमरान-अर्शदीपला मिळू शकते संधी
IND Vs SA 3rd T20 : पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात अंतिम 11 मध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
IND vs SA 3rd T20 Playing 11 : दक्षिण अफ्रिकेच्या संघाने भारताला पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात पराभूत करत मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने दोन्ही सामन्यात अत्यंत सुमार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये फ्लॉप कामगिरी केली. तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजी दोन्हीमध्ये खराब कामगिरी केली. यामुळे आता तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये निश्चित बदल म्हटलं तर, सलामीवीर ऋतुराजसह अष्टपैलू अक्षर आणि गोलंदाज आवेश खानला विश्रांती दिली जाऊ शकते. तर आयपीएल गाजवणाऱ्या अर्शदीप सिंह, उमरान मलिक यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळू शकते.
आतापर्यंत झालेल्या दोन्ही टी20 सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ 7 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत झाला. यावेळी काही खेळाडूंची कामगिरी दोन्ही सामन्यात अत्यंत खराब राहिली. ज्यांची तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी संघातून सुट्टी होऊ शकते. यातील एक म्हटलं तर सलामीवीर ऋतुराज गायकवाड. त्याने पहिल्या सामन्यात 23 तर दुसऱ्या सामन्यात केवळ एक धाव केली. ज्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात त्याच्याजागी युवा वेंकटेश अय्यरला संधी मिळू शकते. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेलने देखील दोन्ही सामन्यात खास कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 10 धावा केल्या. गोलंदाजीत देखील दोन्ही सामन्यात केवळ एक विकेट घेत बऱ्याच धावा दिल्या. त्यामुळे त्याला बसवून फलंदाज दीपक हुडाला संधी दिली जाऊ शकते. तर तिसरा बदल म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असून युवा गोलंदाज आवेशने खास कामगिरी न केल्याने त्याच्या जागी उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंह यांना संधी मिळू शकते.
तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी संभावित प्लेईंग 11 - (India Playing 11 for 2nd T20): ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल,अर्शदीप सिंह/उमरान मलिक.
हे देखील वाचा-