एक्स्प्लोर

Eoin Morgan Retirement : इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन निवृत्त, 35 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'अलविदा'

Morgan Retirement : इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली आहे.

Eoin Morgan : इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गन (Eoin Morgan). पण हाच मॉर्गन मागील काही दिवसांपासून खास फॉर्ममध्ये नसून आता वयाच्या 35 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) घेतली आहे. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली आहे.

क्रिकेट जिथे सर्वात आधी सुरु झालं अशा देशाचा विचार केल्यास इंग्लंडचा नाव सर्वात आधी घेतलं जातं. पण असं असूनही क्रिकेट विश्वचषक सुरु होऊनही कित्येक वर्षे इंग्लंडला विश्वचषक जिंकता आला नाही. पण ही अद्भुत कामगिरी करुन दाखवली इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan) 2019 साली. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात मात देत इंग्लंडने हा विश्वचषक जिंकला होता. पण मॉर्गन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) घेण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केल्याची अधिकृत माहिती आयसीसीने दिली आहे.

मॉर्गनची क्रिकेट कारकिर्द 

2006 साली आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणाऱ्या मॉर्गनने 16 वर्षानंतर निवृत्ती स्वीकारली आहे. आधी 2006 ते 2009 आयर्लंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॉर्गनने पुढील सर्व वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळला. 35 वर्षीय मॉर्गन मर्यादीत षटकांतील उत्तम कर्णधार असण्यासह इंग्लंडकडून धावा करण्यातही आघाडीवर होता. त्याने इंग्लंडकडून 225 एकदिवसीय सामन्यात 13 शतकांसह 6 हजार 957 धावा ठोकल्या. तर आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून 7 हजार 701 धावा 14 शतकांसह केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 126 सामन्यात इंग्लंडचं नेतृत्त्व करत 76 सामने संघाला जिंकवून दिले, त्यामुळे 5.25 हा त्याची सामने जिंकण्याची सरासरी ठरली. यामध्ये 2019 साली त्याने संघाला मिळवून दिलेला पहिला वहिला एकदिवसीय चषक खास ठरला. 

याशिवाय मॉर्गन एक अत्यंत यशस्वी टी20 खेळाडू देखील आहे. त्याने 72 पैकी 42 सामन्यात संघाचा कर्णधार राहून विजय मिळवून दिला. तर 115 टी20 सामन्यात 136.18 च्या सरासरीने 2 हजार 458 धावा केल्या. यावेळी 14 अर्धशतकंही त्याने ठोकली होती. 

हे देखील वाचा - 

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget