Babar Azam: बाबर आझमनं मोडला विराटचा आणखी एक विक्रम, यंदा कोणता रेकॉर्ड मोडला?
Babar Azam Breaks Virat Kohli Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम गेल्या काही दिवसांपासून तुफान फॉर्ममध्ये आहे.
Babar Azam Breaks Virat Kohli Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम गेल्या काही दिवसांपासून तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यानं मागील काही महिन्यांत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ज्यामुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात तुलना करत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे.दरम्यान, बाबर आझम एकदिवसीय आणि टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर, विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. याच दरम्यान, बाबर आझमनं विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडलाय.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर नोंदवला गेलाय. या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. बाबरनं टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज म्हणून 1028 दिवस घालवले आहेत. त्याच्यापाठोपाठ भारताचा विराट कोहली आणि इंग्लंडचा केविन पीटरसनचा क्रमांक लागतो. कोहलीनं 1 हजार 13 दिवस, तर पीटरसननं टी-20 क्रिकेटमध्ये 729 दिवस अव्वल स्थानी घालवले आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक दिवस क्रमांक एकवर राहणारे फलंदाज-
क्रमांक | फलंदाज | दिवस |
1 | बाबर आझम | 1028 |
2 | विराट कोहली | 1013 |
3 | केविन पीटरसन | 729 |
बाबर आझम हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारा बाबर हा एकमेव फलंदाज आहे. बाबर आझमला नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये चौथे स्थान मिळालं आहे. केन विल्यमसन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. ज्यामुळं त्याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या यादीत जो रूट अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मार्नस लॅबुशेन दुसऱ्या तर, स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-