ENG W vs IND W Live Streaming: भारतीय महिला संघ आज इंग्लंडशी भिडणार; कधी, कुठं पाहणार सामना?
ENG W vs IND W Live Streaming: भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्या आज अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.
ENG W vs IND W Live Streaming: भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्या आज अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. लॉर्ड्सच्या इतिहासिक मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केलाय. परंतु, अखरेच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून झुलन गोस्वामीला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये इतिहास घडवला. तब्बल 23 वर्षानंतर महिलांच्या संघानं इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर एकदिवसीय मालिकेत पराभूत केलंय. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला असता त्यांना तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यंदा भारतीय महिलांना दमदार कामगिरी करत तब्बल 23 वर्षांचा इतिहास मोडला.
कधी, कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज (23 सप्टेंबर) लंडनच्या लॉर्ड्स येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, दुपारी 3.30 वा खेळला जाईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लीव अॅपवर पाहता येणार आहे. याशिवाय, एबीपी माझाच्या वेबसाईटवर या सामन्याचे सर्व अपडेट्स पाहता येणार आहे.
भारतीय महिला संघ:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, यास्तिका भाटिया (विकेटकिपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, दयालन हेमलता, झुलन गोस्वामी, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा, सब्बीनघ्न, मीनाघन सिंह, जेमिमाह रॉड्रिग्ज, तानिया भाटिया, सिमरन
इंग्लंड महिला संघ:
टॅमी ब्युमॉंट, एम्मा लॅम्ब, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, डॅनिएल वॉट, एमी जोन्स (कर्णधार/विकेटकिपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन बेल, इस्सी वोंग, माईया बाउचियर, अलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, फ्रेया डेव्हिस.
हे देखील वाचा-