(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs SA: रबाडाच्या हॅटट्रीकमुळे दक्षिण आफ्रिकेचा चौथा विजय, पण पदरी निराशाच
T20 WC 2021, ENG vs SA: टी-20 विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात कगिसो रबाडाच्या हॅटट्रीकमुळे दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला.
T20 WC 2021, ENG vs SA: टी-20 विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात कगिसो रबाडाच्या हॅटट्रीकमुळे दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिका संघाचा चौथा विजय होता. तरिही दक्षिण आफ्रिका संघाच्या पदरी निराशाच पडली आहे. कारण, नेटरनरेट कमी असल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं नाही. अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अ गटांमध्ये ऑस्ट्रलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रत्येकी आठ गुण आहेत. पण चांगल्या रनरेटमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं. गोलंदाजांनीही आपलं काम व्यवस्थित पार पाडलं. मात्र, संघाला मोठा विजय मिळवून देण्यात अपयश आलं. संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात अपयश आलं. अखेरच्या षटकांत कगिसो रबाडानं सलग तीन चेंडूवर तीन विकेट घेत हॅटट्रीक केली. विश्वचषकातील ही तिसरी हॅटट्रीक होय.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघानं 189 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडला विजयासाठी 190 धावांचं लक्ष दिलं होतं. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी इंग्लंडला 131 धावांच्या आतमध्ये थांबवायचं. पण आफ्रिकेच्या गोलंदाजांना यात अपयश आलं. इंग्लंड संघानं निर्धारित 20 षटकांत 170 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना दक्षिण आफ्रिका संघानं 10 विकेटनं जिंकला. मात्र, उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं. अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्या फेरीत पोहचले आहेत. ब गटांमधून पाकिस्तानच्या संघाचं तिकिट पक्कं झालं आहे. दुसऱ्या संघाचा निर्णय आज होणार आहे. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहचणी संधी आहे. आज, दुपारी होणाऱ्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर ब गटातील दुसऱ्या संघाच नाव समोर येईल.
इंग्लंडला 190 धावांचं लक्ष -
स्सी वॅन डेर डूसेन याच्या नाबाद 94 धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकानं इंग्लंड संघासमोर 190 धावांचं लक्ष ठेवलं होतं. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात 189 धावांपर्यंत मजल मारली होती. डूसेन आणि मार्करम यांनी केलेल्या 52 चेंडूत 103 धावांच्या भागिदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघानं 189 धावा बनवल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
इंग्लंडचा 10 धावांनी पराभव -
190 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक राहिली. मधल्या फळीतील फलंदाज मोईन अलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मोईन अलीनं 37 धावांची खेळी केली. त्याशिवाय मलान 33, मॉर्गन 17 यांनीही योगदान देम्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण अफ्रीकाकडून रबाडाने 3, ड्वेन प्रीटोरियस आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.