ENG VS IND 1st T20 Live Updates: इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 50 धावांनी विजय
ENG VS IND 1st T20 Live Updates: बर्मिंगहॅम कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
LIVE
Background
ENG VS IND 1st T20 Live Updates: बर्मिंगहॅम कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला आज (7 जुलै) सामना साउथॅम्प्टनमधील (Southampton) द रोज बाऊल स्टेडियममध्ये (The Rose Bowl) खेळला जातोय. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला रात्री 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. याआधी अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच रात्री 10 वाजता नाणेफेक होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यातील 10 सामन्यात भारतानं इंग्लंडला नमवलंय. तर, 9 सामन्यात भारताला पराभव स्वीकारलाय. यातील 6 सामने भारताबाहेर खेळण्यात आले आहेत, जिथे भारतानं चार आणि इंग्लंडनं दोन जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021 मध्ये शेवटची टी-20 खेळण्यात आली. या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 3-2 नं विजय मिळवला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या तीन टी-20 मालिकेत भारतानंच बाजी मारली आहे. भारत इंग्लंड यांच्या अखेरची टी-20 मालिका 2021 मध्ये खेळण्यात आली होती. या मालिकेत भारतानं 3-2 फरकानं इंग्लंडवर मात केली होती.
भारताचा टी-20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत कृष्णा बुमराह, ऋषभ पंत.
इंग्लंडचा टी-20 संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन फोक्स, जॅक लीच, अॅलेक्स लीस, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, मॅटी पॉट्स, ऑली पोप, जो रूट.
हे देखील वाचा-
- IND-W vs SL-W, 3rd ODI: भारताच्या पोरी एक नंबर, श्रीलंकेला क्लीन स्विप, एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली
- ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना आज! रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल सर्वांचं लक्ष
- Happy Birtday MS Dhoni: शून्यापासून करिअरची सुरुवात, आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार, धोनीच्या संबंधित 41 रंजक गोष्टी