India tour of South Africa : भारतीय क्रिकेट संघाच्या आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर, बीसीसीआयसह क्रिडामंत्री ठाकूर यांची माहिती
दक्षिण आफ्रिकेमध्ये नव्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या प्रकारामुळे सर्व जगाची चिंता वाढली आहे. यामुळे भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुंबई : कोरोना महामारीने (Corona) मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आता कोरोना थोडा आटोक्यात येतोय असं वाटतं असतानाच आता दक्षिण आफ्रिकेमध्ये (Corona Virus South Africa Variant) आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा सर्वांची काळजी वाढवली आहे. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) आगामी दौरा आफ्रिकेतच (India tour of South Africa) असल्याने आता या दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बीसीसीआय आशावादी असली तरी त्याचवेळी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मालिका होण्याची आवश्यकता आहे. सर्व खेळाडूंचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.' असं ते म्हणाले. तर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केवळ बीसीसीआयच नव्हे, तर सर्वच देशांच्या क्रीडा महासंघांनी नव्या करोनाचे रुग्ण वाढणाऱ्या देशांत भारतीय संघ धाडण्यापूर्वी भारत सरकारसह चर्चा करणे योग्य होईल. असं सांगत या दौऱ्यावरील प्रश्नचिन्ह कायम ठेवलं.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुनरागमनानंतर 30व्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार्या भारताचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी सांगितले. भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
17 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू
दोन्ही देशांदरम्यान खेळवली जाणारी ही तीन सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, दुसरी कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर मालिकेतील अंतिम आणि तिसरी कसोटी 03 ते 07 जानेवारी 2022 या कालावधीत खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक
- पहिली वनडे - 11 जानेवारी (बोलंड पार्क)
- दुसरी एकदिवसीय - 14 जानेवारी (केपटाऊन)
- तिसरी एकदिवसीय - 16 जानेवारी (केपटाऊन)
टी-20 वेळापत्रक
- पहिली T20 - जानेवारी 19 (केपटाऊन)
- दुसरी T20 - 21 जानेवारी (केपटाऊन)
- तिसरा T20 - 23 जानेवारी (बोलंड पार्क)
- चौथी T20 - 26 जानेवारी (बोलंड पार्क)
संबधित बातम्या
- IND vs NZ : श्रेयस अय्यरचं पदार्पणातच शतक, कर्णधारांची काळजी मात्र वाढली, नेमकं कारण काय?
- Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?
- IND vs NZ : भारतीय संघाला यष्टीरक्षकाचा नवा पर्याय, टी20 नंतर कसोटीमध्येही कमाल कामगिरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha