Srivalli: डेव्हिड वार्नरलाही लागलं श्रीवल्ली गाण्याचं वेड, पुष्पा चित्रपटातील सिग्नेचर स्टेप करून वेधलं सर्वांचं लक्ष; अल्लू अर्जूनंही म्हणतोय...
David Warner’s Dance Video: दाक्षिणात्य सुपस्टार अल्लू अर्जूनचा पुष्पा: द राईज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून भारतासह जगभरात धुमाकूळ लावलंय. या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय.
David Warner’s Dance Video: दाक्षिणात्य सुपस्टार अल्लू अर्जूनचा (Allu Arjun) पुष्पा: द राईज (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून भारतासह जगभरात धुमाकूळ लावलंय. या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं आपली छाप सोडलीय. याचबरोबर या चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यानं लोकांच्या मनावर भुरळ घातलीय. सर्वसामान्यपासून तर अनेकजण या गाण्यावरील स्टेप करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरलाही श्रीवल्ली गाण्यानं वेड लावलंय. डेव्हिड वार्नरनंही श्रीवल्ली गाण्यावरचे स्टेप करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. त्याच्या पोस्टवर अनेक क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिलीय. एवढंच नव्हे तर स्वत: अल्लू अर्जूनही डेव्हिड वार्नरच्या पोस्टवर कमेंट केलीय.
डेव्हिड वार्नर क्रिकेटचं मैदान गाजवताना आपण अनेकदा पाहिलंय. याशिवाय, सोशल मीडियावरही तो चांगल्याप्रकारे फलंदाजी करताना दिसतो. डेव्हिड वार्नर सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. नुकताच त्यानं पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यातील सिग्नेचर स्टेप केल्या आहेत. श्रीवल्ली गाण्यात ज्याप्रकारे अल्लू अर्जूच्या पायातून चप्पल निसटते. तसेच हुबेहूब अॅक्टिंग करण्याचा डेव्हिड वार्नरनं प्रयत्न केल्याचं या व्हिडिओत दिसतंय. डेव्हिड वार्नरच्या या पोस्टवर अल्लू अर्जूननं हसणाऱ्या इमोजीसह आणि अनेक इमोजी शेअर केल्या आहेत.
डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
डेव्हिड वार्नरनं याआधीही भारतीय चित्रपटातील डायलॉग किंवा गाण्यावरील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, यंदाचा व्हिडिओ क्रिकेट प्रेमींसह अल्लू अर्जूनच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
- हे देखील वाचा-
- IPL 2022 : दहा संघानं कोणते खेळाडू केले खरेदी; कुणाकडे राहिली किती रक्कम? वाचा सविस्तर
- IPL 2022 Player Retention: अहमदाबादने खरेदी केले तीन खेळाडू, हार्दिक पांड्या कर्णधार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha