WI vs IND: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून अर्शदीप सिंहचं तोंडभरून कौतूक
Danish Kaneria: भारताचा युवा फलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) आयपीएल 2022 दमदार प्रदर्शन करून दाखवलं. ज्यामुळं त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय.
Danish Kaneria: भारताचा युवा फलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) आयपीएल 2022 दमदार प्रदर्शन करून दाखवलं. ज्यामुळं त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत त्यानं भारताकडून पहिला टी-20 सामना खेळला. त्यानंतर भारताच्या एकदिवसीय संघातही त्याची निवड करण्यात आलीय. यातच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं (Danish Kaneria) अर्शदीप सिंहचं तोंडभरून कौतूक केलंय. टी-20 विश्वचषकासाठी अर्शदीप सिंह भारतीय संघासाठी चांगला पर्याय आहे, असं त्यानं म्हटलंय. यामागचं कारणही कनेरियानं सांगितलंय.
दिनेश कनेरिया म्हणाला की, टी-20 विश्वचषकासह आशिया चषकातही अर्शदीप सिंहच्या रुपात भारताकडं उत्तम पर्याय आहे. "माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्शदीप सिंह वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळेल आणि चांगली कामगिरी बजावेल. अर्शदीपकडं कला आहे आणि तो गोलंदाजी करताना त्याच्या मेंदूचा चांगला वापरतो. तो समजूतदारपणे गोलंदाजी करतो आणि विकेट कशी काढायची? हे देखील त्याला माहिती आहे. टी-20 विश्वचषक आणि कदाचित आशिया चषकासाठीही तो भारतीय संघासाठी उत्तम पर्याय आहे. आशिया चषक दुबईत होणार असून तेथे तो यशस्वी ठरू शकतो."
टी नटराजनबाबत कनेरिया काय म्हणाला?
अर्शदीपसह त्यानं टी नटराजनही उत्कृष्ट गोलंदाज असल्याचं म्हटलंय. "मला टी नटराजनलाही पुन्हा भारताकडून खेळताना पाहायचंय. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध जशी गोलंदाजी केली होती, पुन्हा तशीच कामगिरी करू शकतो. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. परंतु, सध्या भारताकडं उत्तम गोलंदाज आहेत."
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्शदीपची कामगिरी
देशातंर्गत क्रिकेटमध्ये अर्शदीपनं दमदार कामगिरी केलीय. त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 10 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. तर, लिस्ट ए मध्ये 16 डावात 21 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 58 विकेट्सची नोंद आहे. अर्शदीपनं आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. ज्यात त्यानं दोन विकेट्स मिळवल्या होत्या.
हे देखील वाचा-
- WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल
- Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध; रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड
- Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर