Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध; रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड
Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध झाली असून भाजपचा खास रामदार तडस (Ramdas Tadas) यांची अध्यक्षपदी निवड झालीय.
Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध झाली असून भाजप खास रामदास तडस (Ramdas Tadas) यांची अध्यक्षपदी निवड झालीय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच्या अध्यक्षपदासाठी तीन जणांनी अर्ज केले होते. परंतु, काकासाहेब पवार (Kakasaheb Pawar) आणि धवलसिंह मोहिते पाटील (Dhawal singh Mohite Patil) यांनी अर्ज मागे घेतल्यानं रामदार तडस यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. यामुळं आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता जाणार भाजपचा नेता असणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती.
रामदास तडस यांचा परिचय
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयानं भाजपमध्ये प्रवेश केला होता. रामदास तडस हे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधानपरिषदेतून दोनदा आमदार झाले. तसेच रामदार तडस नगरपरिषदचे अध्यक्षही होते. त्यानंतर 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एसटी महामंडळाचं संचालक पदही भूषवलंय. त्यानंतर 2014 मध्ये भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले.
कुस्ती कुस्तीगीर परिषदचा उद्देश काय?
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात 1953 मध्ये झाली. सर्वात प्रथम पुण्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ज्यात पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, सांगली, सातारा, अमरावती, बुलढाणा, अलिबाग, अकोला, ठाणे, चंद्रपूर, नाशिक, खोपोली, बीड,अहमदनगर, नांदेड, बारामती, औरंगाबाद,सांगवी,अकलूज, भुगाव आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा-
- Maharashtra Politics Shivsena : राजीनाम्यावरून भाजपचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हटले...
- Nashik Snakebite : नाशिक जिल्ह्यात मागील सहा महिन्यात 322 जणांना सर्पदंश, गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे?
- Rajesh Kshirsagar : पोटनिवडणुकीत त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, हिंदुत्वावर बोलणाऱ्या बंडखोर राजेश क्षीरसागरांची अखेर खदखद बाहेर पडलीच!