CWG 2022: जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्ण जिंकलं! वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा, स्पर्धेतील पदकसंख्या पाचवर
CWG 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण पाच पदक जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.
CWG 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या जेरेमी लालरिनुंगानं (Jeremy Lalrinnunga) देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. या स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण पाच पदकं जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.
ट्वीट-
वेटलिफ्टिंगच्या 67 वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या जेरेमीनं स्नॅच इव्हेंटमध्ये 140 किलो वजन उचलून नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून एकूण 300 किलो ग्रॅम वजन उचललं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेतील अखेरच्या प्रयत्नात जेरेमीला अपयश आलं. मात्र, तरीही त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला.
जेरेमीचं जबरदस्त प्रदर्शन
जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील त्याचं पहिलचं वर्ष आहे. याआधी 2018 मध्ये त्यानं युवा ऑलम्पिक स्पर्धेतील 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एवढेच नव्हेतर, गेल्या वर्षी पार पडलेल्या 67 वजनी गटातही त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं.
वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं पाच पदक जिंकली
कॉमनवेल्थ 2022 मधील शनिवार हा भारतीय संघासाठी समाधानकारक ठरला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं काल एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह पाच पदक जिंकली होती. भारतीय वेटलिफ्टर संकेत सरगरनं रौप्यपदक भारताचं खातं उघडलं. त्यानंतर गुरुराज पुजारीनं कांस्यपदक, मीराबाई चानूनं सुवर्णपदक आणि बिंद्याराणी देवीनं रौप्यपदक मिळवलं. यातच जेरेमी लालरिनुंगानं आज वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची पदकांची संख्या पाचवर नेली आहे.
हे देखील वाचा-
- IND vs PAK, CWG 2022: भारतानं नाणेफेक गमावलं, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार
- CWG 2022: जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्ण जिंकलं! वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा, स्पर्धेतील पदकसंख्या पाचवर
- Bindyarani Devi: वेटलिफ्टिंगमध्ये बिंद्याराणी देवीची धडाकेबाज कामगिरी, देशासाठी रौप्यपदक जिंकलं, भारताच्या खात्यात चौथं पदक