(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishabh Pant : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ऋषभ पंतच्या डिस्चार्जबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Rishabh Pant Discharge : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.स्टार क्रिकेटर पंत याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. पंतच्या अपघातानंतर आतापर्यंत भारतीय क्रिकेट चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत होते, पण आता पंतच्या प्रकृतीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानेदेखील सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपण ठिक होत असल्याची माहिती दिली होती. पंतला सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास त्याला या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. वैद्यकीय पथकाने चांगली बातमी दिली आहे. पंतने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपल्या तंदुरुस्तीबद्दल सांगितलं होते. त्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं की, “तुमच्या प्रार्थना आणि समर्थनासाठी मी कृतज्ञ आहे. मी सर्वांना कळवू इच्छितो की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मी लवकर बरा होत आहे. मला दररोज आणखी बरं वाटत आहे. या कठीण काळात तुमच्या सपोर्ट आणि तुम्ही दिलेल्या सकारात्मक उर्जेबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो.
View this post on Instagram
रुरकीला जाताना झाला अपघात
ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती. याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोली आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेशिवाय तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर राहू शकतो. जर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ घेतला तर पंत 2023 च्या विश्वचषकातूनही बाहेर राहू शकतो.
हे देखील वाचा-