एक्स्प्लोर

Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजाचं सीएसकेतून बाहेर पडणं जवळपास निश्चित, महत्वाची माहिती आली समोर

Ravindra Jadeja: आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) सुरु होण्यापूर्वी चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आली.

Ravindra Jadeja: आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) सुरु होण्यापूर्वी चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आली. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेशी असलेलं 10 वर्षांचं जुनं नातं संपवण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सीएसके आणि रवींद्र जडेजा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इनसाइट स्पोर्टच्या अहवालानुसार, रवींद्र जडेजा स्वतःला ट्रेडिंग विंडोमध्ये सूचीबद्ध करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

रवींद्र जडेजानं आता इतर संघांचा पर्याय पाहण्यास सुरुवात केलीय. तसेच रवींद्र जाडेजा आणि चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी संपर्कात नसल्याचं समजत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजाकडं चेन्नईच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, अर्ध्यातूनच त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर दुखापतीमुळं त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं होतं. 

जाडेजा- सीएसकेच्या नात्यात दुरावा
दरम्यान, रवींद्र जाडेजानं काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सीएसकेशी निगडीत सर्व पोस्ट हटवल्या होत्या. त्यानंतर धोनीच्या वाढदिवसानिमित्त सीएसकेनं एक पोस्ट केली होती. ज्यात रवींद्र जाडेजा वगळता सीएसकेचे सर्व खेळाडू होते. 

जडेजा- सीएसकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता
इनसाइट स्पोर्टनं दिलेल्या माहितीनुसार, जडेजाचे मॅनेजर इतर संघांशी ट्रेडिंग ऑफरबाबत चर्चा करत आहेत. महत्वाचं म्हणजे, ट्रेडिंग विंडोचा भाग झाल्यानंतरच जडेजा इतर संघांशी बोलू शकतो. पण त्याआधी जडेजा आणि सीएसकेच्या अधिकाऱ्यांमध्येही बैठक घेण्याची शक्यता आहे.

जाडेजा दहा वर्षांपासून सीएसकेचा भाग
मिळालेल्या माहितीनुसार, असं म्हटलं जातंय की रवींद्र जाडेजानं सीएसकेचा संघ सोडण्याचा निश्चय पक्का केलाय. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्याच्यासोबत जे काही घडलं? ज्यामुळं तो दु:खी झालाय. एवढेच नव्हे तर, तो इतर संघाचा पर्यायही शोधत आहे. रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. आयपीएलच्या मागच्या हंगामात रवींद्र जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद रवींद्र जाडेजाकडं सोपवलं होतं. परंतु यादरम्यान ना संघ चांगली कामगिरी करू शकला ना जडेजा. जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीतही मैदानावरही संघर्ष करताना दिसला. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Team India News : अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा
अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा
Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
Ind vs Ban W Asia Cup Semi Final : आशिया कपचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारा सामना! भारत-बांगलादेशच्या सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं? ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती!
आशिया कपचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारा सामना! भारत-बांगलादेशच्या सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं? ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती!
Ind vs Afg 1st T20I : भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेआधी मोठा ड्रामा; तारीख बदलण्याची दिल्ली पोलिसांची विनंती, आता कधी होणार सामना?
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेआधी मोठा ड्रामा; तारीख बदलण्याची दिल्ली पोलिसांची विनंती, आता कधी होणार सामना?

व्हिडीओ

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
Mantralay : मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
Maharashtra Weather Update: मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, तर मुंबई, रायगड, पुण्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, तर मुंबई, रायगड, पुण्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Sanjay Dutt U Turn On Marathi Language Statement: 'मस्करी करत होतो, मला चांगलं मराठी येतं...'; मराठी येत नाही, म्हणणाऱ्या संजय दत्तचा आता यूटर्न, प्रताप सरनाईकांना फोन करुन म्हणाला...
'मस्करी करत होतो, मला चांगलं मराठी येतं...'; मराठी येत नाही, म्हणणाऱ्या संजय दत्तचा आता यूटर्न, प्रताप सरनाईकांना फोन करुन म्हणाला...
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
Embed widget