IND vs PAK: 'धोनीचा तो सल्ला अन् सामनाच पलटला!' भज्जीनं सांगितला भारत-पाकिस्तान सामन्यातील मॅच विनिंग किस्सा
Harbhajan Singh on India vs Pakistan Match: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारतानं 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
Harbhajan Singh on India vs Pakistan Match: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारतानं 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतानं शेजारी देश श्रीलंकेला पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषकारवर नाव कोरलं. मात्र, या विश्वचषकातील उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या संघानं भारताला (India Vs Pakistan) टक्कर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, महेंद्रसिंह धोनीच्या सल्ल्यानं सामना कसा पलटला? हे भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहनं (Harbhajan Singh) सांगितलंय.
भारत- पाकिस्तान सामना रोमांचक स्थितीत होता. दरम्यान, पाकिस्तानच्या डावातील 33 व्या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक दरम्यान धोनीनं हरभजन सिंहशी चर्चा केली. त्यावेळी धोनीनं हरभजन सिंहला धोकादायक दिसणार्या उमर अकमलला विकेटभोवती गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. ड्रिंक्स ब्रेकनंतर हरभजन सिंहनं पहिलाच चेंडू धोनीनं सांगितल्याप्रमाणे टाकला आणि उमर अकमल बाद झाला. उमर अकमलचं बाद होणं, या सामन्यातील टर्निंग पॉईंट होता, असं हरभजन सिंहनं म्हटलंय.
हरभजन सिंह काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सच्या दिल से इंडिया या कार्यक्रमात हरभजन सिंह म्हणाला की, "हा अशा सामन्यांपैकी एक होता, जिथं मला वाटलं की मी थोडं नर्वस फिल करत होतो. मी पाच षटकं टाकली, ज्यात सुमारे 26-27 धावा दिल्या. यानंतर ड्रिंक्स ब्रेक झाला. त्यावेळी धोनीनं मला भज्जू पा विकेट्स आसपास गोलंदाजी कर, असं सांगितलं. उमर चांगला खेळत होता आणि मिसबाहही धावा करत होता. त्यांच्यातील भागीदारी धोकादायक बनत चालली होती."
भारतानं 29 धावांनी हा सामना जिंकला
हरभजन सिंह पुढे म्हणाला की, "मग मी गोलंदाजी करायला आलो आणि मला देवाकडं विजयासाठी प्रार्थना केली आणि देवानं माझं ऐकलं. मी विकेटच्या आसपास चेंडू टाकताच पहिल्याच चेंडूवर मला उमर अकमलची विकेट मिळाली. त्यानं माझा चेंडू पूर्णपणे चुकवला. अकमल (29 धावा) बाद झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर वर्चस्व राखलं, ज्यातून पाकिस्तानी संघ सावरू शकला नाही. अखेर पाकिस्तानच्या संघाला 29 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला."
हे देखील वाचा-