Rishabh Pant Ruled OUT 5th Test : चौथा कसोटी सामना संपताच BCCIची घोषणा! ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, धाकड खेळाडूची निवड, कोण आहे तो?
England vs India 5th Test Update : भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

Rishabh Pant ruled out of 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला जबरदस्त धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा खेळाडू आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. मँचेस्टर कसोटीत फलंदाजी करत असताना त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतरच त्याचा पुढील सहभाग अनिश्चित मानला जात होता. अखेर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि बीसीसीआयने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा
बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, मँचेस्टर कसोटीदरम्यान उजव्या पायाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे ऋषभ पंत उर्वरित मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी नारायण जगदीशनला संघात स्थान देण्यात आले आहे. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 31 जुलैपासून केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
🚨 𝗦𝗾𝘂𝗮𝗱 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲 🚨
— BCCI (@BCCI) July 27, 2025
Rishabh Pant ruled out of fifth Test due to injury; N Jagadeesan named replacement.
All The Details 🔽 #TeamIndia | #ENGvIND
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर काय म्हणाले?
सामना संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, "ऋषभ पंत मालिकेबाहेर गेला आहे. दुखापत झाली असताना, त्याने जी फलंदाजी केली, त्यासाठी त्याचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. अशा प्रकारचं धाडस फार थोड्यांनी दाखवलं आहे. हे आजच्या पिढीनेही लक्षात घ्यायला हवं, आणि पुढच्या पिढीलाही याची प्रेरणा मिळायला हवी. तो सध्या ज्या फॉर्ममध्ये होता, त्याला पाहता ही टीमसाठी मोठी धक्का आहे. पण मला खात्री आहे की तो लवकरच पूर्ण बरा होऊन पुनरागमन करेल. ऋषभ पंत हा आमच्या टेस्ट संघाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे."
एन. जगदीशन कोण आहे?
ऋषभ पंतच्या जागी भारतीय कसोटी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाजाचं नाव एन. जगदीशन आहे. 24 डिसेंबर 1995 रोजी तमिळनाडूमध्ये जन्मलेल्या नरनसाप्पा जगदीशन याने अजून भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. मात्र, घरगुती क्रिकेटमध्ये तो एक अनुभवी आणि तितकाच प्रभावी खेळाडू मानला जातो. 29 वर्षीय या फलंदाजाने 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3373 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 10 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, जगदीसनने 64 लिस्ट ए सामन्यांमध्ये 2728 धावा आणि 66 टी-20 सामन्यांमध्ये 1475 धावा केल्या आहेत.
पाचव्या कसोटीसाठी भारताचा अपडेट संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव. एन जगदीसन (यष्टीरक्षक)
हे ही वाचा -





















