Women’s IPL: पुढच्या वर्षी रंगणार महिला आयपीएलचा थरार; बीसीसीआयच्या एजीएम मिटिंगमध्ये महत्वाची घोषणा
मुंबईत (Mumbai) आज बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Rojer Binny) यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
BCCI Annual General Meeting 2022: मुंबईत (Mumbai) आज बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Rojer Binny) यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर या सभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात महिला आयपीएलचाही (Women’s IPL) समावेश आहे. पुरूषांप्रमाणे पुढच्या वर्षी महिला आयपीएलचंही आयोजन केलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. महिला आयपीएलध्ये सुरुवात पाच संघ सहभागी होतील. परंतु, महिला आयपीएलचं ऑक्शन कसं होईल? याबाबत मंगळवारी निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, बीसीसीआय लोकप्रिय किंवा मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांचा वर्ग असलेल्या शहरांचं नाव या संघांना देऊ शकतं.
5 संघांमध्ये रंगणार महिला आयपीएलचा थरार
बीसीसीआयच्या सध्याच्या प्लॅननुसार, महिला आयपीएलचा पहिला हंगामा फक्त ठिकाणी पार पडणार आहे. फक्त पाच संघ या लीगमध्ये सहभाग दर्शवतील. पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत या लीगमधील एका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. या पाच परदेशी खेळाडूंपैकी चार खेळाडू आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांमधील असतील. तर, 5 वा खेळाडू असोसिएट्स देशाचा असू शकतो. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू सहभागी होतील. ज्यात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडू असतील.
ट्वीट-
🚨 Update 🚨: 91st Annual General Meeting of BCCI
— BCCI (@BCCI) October 18, 2022
The 91st Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India (BCCI) was held on October 18th, 2022, in Mumbai.
The key decisions made are as under 🔽https://t.co/c2XV2W2Opl
बीसीसीआयवरील नियुक्त्या-
पद | नाव |
अध्यक्ष | रॉजर बिन्नी |
उपाध्यक्ष | राजीव शुक्ला |
सचिव | जय शाह |
सहसचिव | देवजीत सैकिया |
खजिनदार | आशिष शेलार |
आशिष शेलार यांची खजिनदार म्हणून नियुक्ती
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला असतील. सचिवपदी जय शाह यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर सहसचिवपदी देवाजीत सैकिया असतील. खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आलीय.
हे देखील वाचा-