Ind vs Aus : विराट-रोहितची चर्चा नाहीच, दोन कर्णधारांचा प्रयोग! ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी BCCI कडून टीम इंडियाचा A संघ जाहीर, जाणून घ्या कोणत्या शिलेदारांना संधी?
India A squad for Australia A series : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे.

BCCI announces India A squad for Australia A series : आशिया कप 2025 मध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रंगणार असतानाच वरिष्ठ निवड समितीने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवली जाणार असून तीनही सामने याच ठिकाणी होतील.
दोन कर्णधारांचा प्रयोग!
30 सप्टेंबरला मालिकेचा पहिला सामना ग्रीन पार्क येथे खेळला जाईल. दुसरा सामना 3 ऑक्टोबरला तर तिसरा आणि शेवटचा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. सर्व सामने दुपारी 1:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होतील. पहिल्या वनडेत रजत पाटीदार (Rajat Patidar) भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करतील. उर्वरित दोन सामन्यांसाठी तिलक वर्मा (Tilak Varma) कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असून पाटीदार उपकर्णधाराची भूमिका निभावतील.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
— BCCI (@BCCI) September 14, 2025
India A squad for one-day series against Australia A announced.
All The Details 🔽https://t.co/V8QokLO6zr
विराट-रोहित संघात नाहीत! (No Virat Kohli Rohit Sharma)
यापूर्वी अशी चर्चा होती की, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यापूर्वी तयारीसाठी या मालिकेत खेळतील. मात्र जाहीर झालेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता निश्चित झाले आहे की कानपूरच्या ग्रीन पार्कवर या मालिकेत हे दोघेही मैदानात उतरणार नाहीत.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिली वनडे : 30 सप्टेंबर, कानपूर
- दुसरी वनडे : 3 ऑक्टोबर, कानपूर
- तिसरी वनडे : 5 ऑक्टोबर, कानपूर
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ (India A squad for Australia A series)
रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी भारत अ संघ (India A squad for Australia A series)
तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
हे ही वाचा -





















