Ind vs Aus Women 1st ODI : ब्युटी क्वीन हर्लिन देओचा धमाका, कांगारुंना धू-धू-धुतलं, चौकार-षटकारांचा पाऊस; ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभारला 281 धावांचा डोंगर
भारतीय महिला संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 गडी गमावून 281 धावांचा डोंगर उभारला.

India Women vs Australia Women, 1st ODI : भारतीय महिला संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 गडी गमावून 281 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी प्रतिका रावल (64), स्मृती मानधना (58) आणि हर्लिन देओल (54) यांनी अर्धशतके ठोकली. उपकर्णधार स्मृती आणि प्रतिकाने पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र, या सामन्यात आपल्या तडाखेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली ती हर्लिन देओलने.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!#TeamIndia posted 281/7 on the board! 💪
— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025
6⃣4⃣ for Pratika Rawal
5⃣8⃣ for vice-captain Smriti Mandhana
5⃣4⃣ for Harleen Deol
Over to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Fw3TUl2thL#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AUhrBa6yKX
हर्लिन देओलची झंझावाती खेळी
कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या 150व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाने दमदार सुरुवात करून दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हर्लिन देओलने आक्रमक फलंदाजीचा धडाका लावत केवळ 57 चेंडूत 54 धावा केल्या. तिच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. संपूर्ण डावात हरलीनने एक क्षणही बचावात्मक खेळ न करता सतत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
A half-century filled with stylish stroke play!
— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025
4th ODI Fifty for Harleen Deol 👏👏#TeamIndia inching closer to the 200-run mark
Updates ▶️ https://t.co/LS3igwDIqz#INDvAUS | @IDFCFirstBank | @imharleenDeol pic.twitter.com/49Wxr8LF6f
विश्वचषकापूर्वी मिळालेली लय
हर्लिन देओलच्या या अर्धशतकाने तिचा उत्तम फॉर्म सिद्ध झाला आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी ही लय टीम इंडियासाठी मोठा फायदा ठरू शकते. तिसऱ्या क्रमांक तिची झंझावाती फलंदाजी प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.
A MAXIMUM from Harleen Deol to get things going 🔥#TeamIndia 131/1 after 26 overs
— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025
Updates ▶️ https://t.co/LS3igwDIqz#INDvAUS | @IDFCFirstBank | @imharleenDeol pic.twitter.com/L3ZfNC8mVB
भारताचा डाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 50 षटकांत 7 बाद 281 धावा केल्या. हर्लिन देओलच्या चमकदार अर्धशतकासह स्मृती मंधानाने 58 धावा तर प्रतिका रावलने ओपनिंग करताना 64 धावा ठोकत आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली.
💯 partnership 🆙 for the opening wicket!
— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025
Pratika Rawal 🤝 Smriti Mandhana
A solid start with the bat from #TeamIndia 💪
Updates ▶️ https://t.co/LS3igwDIqz#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/6H9ynKql3C
हे ही वाचा -




















