IND vs WI, 2nd T20 Playing 11 : एक बदलासह दुसऱ्या टी20 साठी भारतीय संघ सज्ज, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील टी20 मलिकेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India vs West Indies Playing 11 Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली. पहिल्या सामन्याप्रमाणे आजही वेस्ट इंडीजने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघानी आपआपले संघ जाहीर केले असून यावेळी भारताने संघात एक तर वेस्ट इंडीजने दोन बदल केले आहेत. भारतीय संघ आज तीन जागी दोन फिरकीपटू घेऊन खेळत आहे.
भारतीय संघ आज रवी बिश्नोईच्या जागी आवेश खानला मैदानात घेऊन उतरणार आहेत. आज सामना होणाऱ्या ठिकाणी तीन फिरकीटूंपेक्षा एक अधिक वेगवान गोलंदाज लागणार असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं. ज्यामुळे आजही सलामीला रोहितसोबत सूर्यकुमार, त्यानंतर श्रेयस अय्यर, पत, दिनेश कार्तिक हे मैदानात येतील. अष्टपैलू कामगिरीकरता जाडेजा, आश्विन हे असून गोलंदाजीची जबाबदारी आश्विन, जाडेजा सह भुवनेश्वर, अर्शदीप आणि आवेश खानवर असेल तर नेमका संघ कसा आहे पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह
कसा आहे वेस्ट इंडीज संघ?
काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.
आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 6 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
हे देखील वाचा-