एक्स्प्लोर

Judo Silver Medal: भारताच्या सुशीला देवीची ऐतिहासिक कामगिरी, ज्युदोत रौप्यपदकाची कमाई!

Commonwealth Games : ज्युदोत भारताला आज दोन पदकं मिळाली असून सुशीला देवीने रौप्य पदक जिंकलं असून विजय कुमारने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

 CWG 2022, Sushila Devi :  इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये कमाल सुरु असतानाच आता ज्युदो खेळातही भारताने दोन पदकांना गवसणी घातली आहे. यामध्ये सुशीला देवी लिकमाबम (Shushila Devi) हीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या मायकेला व्हाइटबूईने तिला मात दिल्यामुळे सुशीलाचं सुवर्णपदक हुकलं. दुसरीकजे विजय कुमार याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे.

2014 साली पार पडलेल्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील सुशीला देवीने रौप्यपदक मिळवलं होतं. ज्यानंतर आताही इतिहासाची पुनरावृत्ती करत सुशीलाने बर्मिंगहम कॉमनवेल्थ खेळांमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. सुशीलाने अंतिम सामन्यात कडवी झुंज दिली. पण 4.25 मिनिटं चाललेल्या फायनलमध्ये अखेर सुशीलाला पराभव पत्करावा लागला.

मेहनतीच्या जोरावर सुशीलाने घडवला इतिहास 

इम्फालमधील सामान्य कुटुंबातून आलेल्या सुशीलाने आज पदक मिळवत अवघ्या देशाचं नाव वर केलं आहे. सुशीलाचे वडीलही आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युदोपटू असल्याने तिच्या रक्तातच ज्युदो होतं. पण या खेळासाठी येणारा खर्च करताना एकेकाळी तिला कारही विकावी लागल्याचं समोर आलं होतं. पण सर्व अडचणींवर मात करत मेहनतीच्या जोरावर सुशीलाने इतिहास घडवला आहे. 

भारताची पदकसंख्या आठवर

सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली आहे. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपम फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपगक भारताने निश्चित केलं आहे. या पदकासह भारताच्या खात्यावर नऊ पदकं झाली असून हे नववं पदक सुवर्ण असेल की रौप्य हे पाहावं लागेल. 

हे देखील वाचा- 

Commonwealth Games 2022 : अमित पाठोपाठ मोहम्मद हुसामुद्दीनही उपांत्यपूर्व फेरीत, बांग्लादेशच्या बॉक्सरला मात देत मिळवला प्रवेश

CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदकतालिकेत भारताची मोठी झेप; तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget