Andrew Symonds : 'रात्री त्या सुनसान रस्त्यावर अँड्र्यू एकटा काय करत होता?,' बहिणीच्या शंकेने निर्माण केलं नव गूढ
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. दरम्यान अँड्र्यू असणाऱ्या गाडीत कोणतीही इतर व्यक्ती नव्हती. पण त्याचे दोन पाळीव श्वान यावेळी त्याच्यासोबत होते.
Andrew Symonds Sister Letter : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा(Andrew symonds) रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबासह क्रिकेट जगतावर शोककळा पसरली असून अँड्र्यूंची बहिण लुईस सायमंड्स मात्र फारच दुखी झाली आहे. तिने अँड्र्यूच्या आठवणीत एक भावनिक नोट लिहित त्याच्या मृत्यूनंतर काही शंका उपस्थित केल्या आहेत.
अँड्र्यूची बहिण लुईसने लिहिलेल्या नोटमध्ये तिने लिहिलं आहे की, 'तू खूप लवकर निघून गेलास. मला वाटतं अजून एक दिवस आपण सोबत असतो. अजून एक फोन कॉल आपण केला असता, मी पूर्णपणे तुटली आहे. मी कायम तुझ्यावर प्रेम करेन भावा.' दरम्यान रिपोर्ट्सच्या माहितीनुसार लुईसने घटनेबाबत माहिती देताना म्हटलं आहे, 'ही दुर्घटना खूप भयानक होती. पण त्यावेळी एकटा अँड्र्यू त्या सुनसान ठिकाणी काय करत होता हे अजूनही कळालेले नाही. तसंच अपघातावेळी गाडीत असणारे अँड्र्यूचे दोन्ही श्वान मात्र वाचले आहेत.'
श्वानांना मालकापासून दूर जाता येत नव्हतं
अँड्र्यू सायमंड्सचा अपघात ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथे झाला. टाऊन्सविले शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंज याठिकाणी हा अपघात झाला. दरम्यान अपघातानंतर काही मिनिटांतच बेबेथा नेलिमन आणि तिचा बॉयफ्रेड वेलॉन टाउनसन हे त्याठिकाणी उपस्थित होते. पण त्यांनी पाहिलं असता सायमंड्सच्या पल्स सुरु नव्हत्या. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला एक कार उलटलेली दिसली ज्यामध्ये एक माणूस होता, त्या गाडीत इतर कोणी नव्हते पण दोन श्वान दिसून आले. दरम्यान या श्वानांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यातील एका श्वानाने मालकाची बाजू सोडण्यास नकार दिला.'' दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या या माहितीतून अँड्र्यू आणि त्याच्या श्वानांमध्ये किती जवळीक होती हे दिसून आलं. याआधीही अनेकदा श्वान त्यांच्या मालकांवर जीवापाड प्रेम करत असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पुन्हा एकदा या गोष्टीचा प्रत्यय आला.
अँड्र्यूची कारकिर्द
जगातील अव्वल दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूंची जेव्हाही यादी बनेल त्यात सायमंड्सचं नाव नक्कीच वरच्या फळीत असेल. सायमंड्सचं क्रिकेट करिअर अतिशय शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 रन बनवले. यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्ध शतकांचा समावेश आहे. सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू असल्याने त्याने वनडे फॉर्मेटमध्ये त्याने 133 विकेटही घेतल्या. तसेच 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले.
हे देखील वाचा-
- Andrew Symonds : 'त्या गाडीत अँड्र्यू सायमंड्ससोबत होते त्याचे दोन श्वान, मृत्यूनंतरही मालकाला सोडत नव्हते,' प्रत्यक्षदर्शींचा खुलासा
- Andrew Symonds : ...म्हणून क्लार्कसोबतच्या नात्यात दुरावा! आयपीएलबाबत अँड्र्यू सायमंड्सनं केलं होतं खळबळजनक वक्तव्य
- Andrew Symonds Death: ‘बिग बॉस 5’मध्येही सहभागी झाला होता अँड्र्यू सायमंड्स, सनी लिओनीशी जमलेली खास मैत्री!