Andrew Symonds Death: ‘बिग बॉस 5’मध्येही सहभागी झाला होता अँड्र्यू सायमंड्स, सनी लिओनीशी जमलेली खास मैत्री!
Andrew Symonds Death: सायमंड्सच्या निधनाने ऑस्ट्रेलियासह जागतिक क्रिकेटविश्ववारही शोककळा पसरली आहे.
Andrew Symonds Death: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचे अपघाती निधन झाले आहे. शनिवारी कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सायमंड्सच्या निधनाने ऑस्ट्रेलियासह जागतिक क्रिकेटविश्ववारही शोककळा पसरली आहे. सायमंड्सने आपल्या कारकिर्दीत अनेक आठवणीत राहतील असे सामने खेळले. यासोबतच तो अनेक वादांमुळेही चर्चेत राहिला होता. सायमंड्सशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट म्हणजे तो टीव्ही शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान त्याची सनी लिओनीशी मैत्री मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती.
क्रिकेट सामन्यांमुळे सायमंड्स भारतात यायचा. या काळात तो खूप लोकप्रियही झाला होता. क्रिकेटच्या मैदानाबाहेरही तो नेहमीच चर्चेत राहिला होता. सायमंड्स टीव्ही शो 'बिग बॉस 5' मध्ये झळकला होता. सनी लिओनीसोबतच्या मैत्रीमुळे तो खूप लोकप्रिय झाला. सायमंड्स आपल्या कामगिरीने क्रिकेटच्या मैदानावर वर्चस्व गाजवत असायचा. क्रिकेटशिवाय त्याचे नाव इतर अनेक वादांशी जोडले गेले होते. दारूच्या व्यसनामुळे तो अनेकदा चर्चेत आला होता. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात तो अभिनेत्री सनी लिओनीसोबतच्या नात्यामुळे विशेष चर्चेत आला होता.
अपघातात गमावला जीव
ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्सचे निधन झाले आहे.
डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं.
हेही वाचा :
Andrew Symonds : ...म्हणून क्लार्कसोबतच्या नात्यात दुरावा! आयपीएलबाबत अँड्र्यू सायमंड्सनं केलं होतं खळबळजनक वक्तव्य